कमी संख्याबळ असूनही झेडपीवर भाजपची बाजी...

 केवळ 14 एवढं संख्याबळ असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं बाजी मारली. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि स्वाभिमान संघटनेचे संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांना भाजपनं निवडून आणलं. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 22, 2017, 07:46 PM IST
कमी संख्याबळ असूनही झेडपीवर भाजपची बाजी...  title=

सोलापूर :  केवळ 14 एवढं संख्याबळ असतानाही सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपनं बाजी मारली. राष्ट्रवादीचे बंडखोर आणि स्वाभिमान संघटनेचे संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी शिवानंद पाटील यांना भाजपनं निवडून आणलं. 

भाजपनं सर्वपक्षीयांची मोट बांधल्यानं राष्ट्रवादीला या निवडणुकीत माघार घेणं भाग पडलं. या माध्यमातून राष्ट्रवादीच्या दुस-या फळीतल्या नेत्यांनी बड्या मातब्बर नेत्यांना जबर झटका दिल्यानं सोलापूर जिल्ह्याचं राजकारण बदलून गेलंय. 

विजयसिंह मोहिते पाटलांना विश्वासात न घेता, राष्ट्रवादीच्या उमेदवारानं माघार घेतल्यानं त्यांचे पुतणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिलाय. तर जयसिंह मोहिते पाटील यांनीही पक्षातून बाहेर पडण्याचं सूतोवाच केलंय.