सांगली : मागील 55 वर्षात प्रथमच सांगली जिल्हा परिषदेवर भाजपा – शिवसेनेची सत्ता आली आहे.
कॉंग्रेस – राष्ट्रवादी आघाडीचा पराभव झाला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि इतर नेत्यांना धक्का आहे. भाजपाचे संग्रामसिंह देशमुख हे अध्यक्षपदी तर शिवसेनेचे सुहास बाबर यांची उपाध्यक्ष पदी निवड़ झालीये.
दोघेही तब्बल दहा मतांनी निवडून आले आहेत. युतीच्या काळात १९९५ ला मला मंत्री पदाचा लाल दिवा नको पण दुष्काळी भागाची टेंभू योजना सुरु करा, अशी आग्रही भूमिका घेणारे अपक्ष माजी आमदार स्वर्गीय संपतराव देशमुख यांचे संग्रामसिंह पुत्र आहेत.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या रूपाने लाल दिवा देवूनभाजपाने देशमुख परिवाराला न्याय दिला आहे.