narayan rane

वांद्रेत शिवसेना कार्यकर्त्यांचा राणेंच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष

वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार नारायण राणे पिछाडीवर पडल्यावर शिवकार्यकर्त्यांनी जुहू येथील त्यांच्या घरासमोर फटाके फोडून जल्लोष केला. दरम्यान, तृप्ती सावंत यांचा विजय १९ हजार ८ मतांनी झाल्याचे समजताच कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन जल्लोष साजरा केला.

Apr 15, 2015, 12:57 PM IST

राणे समर्थकांची 'कॉमन मॅन'ला मारहाण

नारायण राणे समर्थकांकडून एका सामान्य माणसाला मारहाण झाल्याचं समोर आलं आहे. वांद्रे पोटनिवडणुकीत नाराणय राणे पराभवाच्या छायेत असतांना, शिवसैनिकांनी नारायण राणे यांच्या घरासमोर फटाकेफोडून जल्लोष केला.

Apr 15, 2015, 12:51 PM IST

तृप्ती सावंत यांची विजयाकडे कुच, राणेंचा पराभव निश्चित

वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसच्या नारायण राणे यांना निर्णयाक आघाडी घेता आलेली नाही. पहिल्या फेरीपासून ते पिछाडीवरच राहिले. मात्र, शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तृप्ती सावंत यांचा विजय निश्चित असून राणेंचा पराभव अटळ असल्याचे दिसून आले आहे.

Apr 15, 2015, 11:51 AM IST

वांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच

वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.

Apr 15, 2015, 11:16 AM IST

...तयारी वांद्र्याच्या मतमोजणीची

...तयारी वांद्र्याच्या मतमोजणीची

Apr 14, 2015, 09:09 PM IST

वांद्रे निवडणूक : राणे जिंकले तर... हरले तर...

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरणार आहे. आधीच निराशाच्या गर्तेत असलेल्या काँग्रेसच्या राज्यातील भविष्याच्या वाटचालीवर हा निकाल परिणाम ठरणार आहे. तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निकाल शिवसेनेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. विशेष म्हणजे नारायणे राणेंचे राजकीय भवितव्य या निवडणुकीवर अवलंबून असणार आहे.

Apr 14, 2015, 06:40 PM IST

राणेंच्या तक्रारीनंतर खासदार राऊत पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना खासदार विनायक राऊत यांना काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Apr 11, 2015, 04:06 PM IST

मीच शिवसेनेचे मंत्री, आमदारांना रोखणार - नारायण राणे

माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने काँग्रेस नेते नारायण राणे अधिक आक्रमक झाले आहेत. वांद्रे मतदार संघात शिवसेनेचे मंत्री, आमदार फिरत असताना त्यांच्यावर कारवाई नाही. आता मीच त्यांना रोखणार, असा स्पष्ट इशारा राणे यांनी दिला.

Apr 11, 2015, 01:05 PM IST

माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आपल्या मुलाला ताब्यात घेणे चुकीचे आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि उमेदवार नारायण राणे यांनी केला. 

Apr 11, 2015, 12:35 PM IST

शिवसेनेला कायदा समजत नाही : नारायण राणे

शिवसेनेला कायदा समजत नाही, शिवसेना आणि कायदा यांचा संबंध नाही. त्यामुळे प्रचार संपला असताना पत्रकार परिषद घेऊ नये असा कोणताही नियम नसल्याचा टोला माजी मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत लगावला. 

Apr 10, 2015, 04:44 PM IST