narayan rane

राणेंचं 'शोक'पर्व, नाराज राणेंना अशोक चव्हाणांचा टोला

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केल्यामुळं काँग्रेसमध्ये नाराजीचे वारे वाहू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांनी चव्हाणांच्या नियुक्तीवर उघड नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील नेत्यांना विश्वासात न घेताच निर्णय घेण्यात आल्याचा आरोप राणेंनी केलाय. 

Mar 2, 2015, 07:51 PM IST

स्विस बँकेत माझं खातं नाही - नारायण राणे

एचएसबीसी बँकेत आपलं कोणतंही अकाऊंट नसल्याचं काँग्रेस नेते नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाहीतर आपला मुलगा नितेश यांच्या नावाचं देखिल अकाऊंट स्वित्झर्लंडच्या बँकेत नसल्याचं नारायण राणे यांनी सांगितलं आहे.

Feb 9, 2015, 04:40 PM IST

'सरकारला अनुभवही नाही, अन काम करण्याची इच्छाही'

'सरकारला अनुभवही नाही, अन काम करण्याची इच्छाही'

Feb 5, 2015, 09:22 AM IST

नारायण राणेंना 'दे धक्का', कट्टर समर्थक पडतेंची 'घरवापसी'

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तसंच नारायण राणे यांचे खंदे समर्थक संजय पडते यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय.

Jan 31, 2015, 10:13 AM IST

अखेर, केसरकरांनी राणेंवर मात केलीच!

नारायण राणे ज्या मडूरे टर्मिनससाठी आग्रही होते तो प्रस्ताव मागे पडलाय. राणे व केसरकर यांच्यात याच टर्मिनसवरून गेली तीन वर्षे वाद सुरु होता. सत्ता येताच राज्य सरकारने सावंतवाडी टर्मिनल मंजुरीसाठी  पाठवून एका अर्थी राणेंना चपराक दिलीय. 

Jan 24, 2015, 07:19 PM IST

Exclusive : हिरवंगार कोकण आता भगवं

सिंधुदुर्गातलं राजकारण गेल्या नऊ वर्षांत पूर्णपणे बदलून गेलंय, राजकीय समीकरणं झपाट्यानं बदललीयत. नाथ पै, मधु दंडवते ते कोकणात शिवसेना... शिवसेना ते काँग्रेस आणि काँग्रेस ते शिवसेना असं एक वर्तुळ पूर्ण झालंय.

Nov 29, 2014, 09:11 PM IST

राणेंचा शिवसेनेवर 'प्रहार', सत्तेसाठी लाचारी

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे केवळ पर्यटक म्हणून कोकणात आले आहेत. तसंच शिवसेनेने कोकणी माणसांची फसवणूक केली असून, सत्तेसाठी लाचार झालेल्या सेनेतील आमदार फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं राणे म्हणालेत.

Nov 23, 2014, 03:36 PM IST

राणे हरलेत, 'ते' चक्क घालणार सोन्याच्या चपला

नारायण राणे यांनी शिवसेनेला जय महारष्ट्र केल्यानंतर अनेक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. त्यापैकी अरविंद भोसले हे एक. त्यांनी राणे ज्यावेळी निवडणुकीत पराभूत होतील, तोपर्यंत मी अनवाणी राहीन, अशी प्रतिज्ञा केली. ही प्रतिज्ञा त्यांनी राणेंचा पराभव होईपर्यंत पाळली. राणेंचा पराभव २०१४ च्या निवडणुकीत झाल्याने त्यांनी चप्पल वापरण्यास सुरुवात केली.

Nov 20, 2014, 10:54 AM IST