वांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच

वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.

Updated: Apr 15, 2015, 11:16 AM IST
वांद्रा पूर्व शिवसेनेचेच, तासगावात राष्ट्रवादीच title=

मुंबई : वांद्रे पूर्व मतदार संघात पुन्हा भगवा पडकणार हे आता निश्चित स्पष्ट झाले आहे. तर तासगाव सांगलीत राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचे विक्रमी मतांनी घेतलेल्या आघाडीवरुन दिसून आले आहे.

राजकीय वर्चस्वाच्या लढाईत रंगलेल्या वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेने बाजी मारल्याचे चित्र असून, शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी मोठी आघाडी घेतली आहे. तर, दुसरीकडे तासगाव पोटनिवडणुकीतही माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार सुमन पाटील विजयाच्या उंबरठ्यावर आहे. केवळ घोषणाच बाकी आहे.

वांद्रे पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मतमोजणीत शिवसेनेने मोठी आघाडी घेतली असून, काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे अकराव्या फेरीअखेर पिछाडीवर होते. तर एमआयएमचे उमेदवार राजा रहेबरखान यांचा करिष्मा दिसेल असे वाटत होते. मात्र, असे काहीही झालेले दिसत नाही. ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.

वांद्रेतील सर्वच प्रभागांत कमी मतदान झाल्याने कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात धाकधूक होती. पण, शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी मोठी आघाडी घेत राणे यांनी पिछाडीवर सोडले आहे. सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेचे पारडे जड वाटत आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.