माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात

माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आपल्या मुलाला ताब्यात घेणे चुकीचे आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि उमेदवार नारायण राणे यांनी केला. 

Updated: Apr 11, 2015, 12:35 PM IST
माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : माजी खासदार नीलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आपल्या मुलाला ताब्यात घेणे चुकीचे आहे. राज्य सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते आणि उमेदवार नारायण राणे यांनी केला. 

नीलेश राणे यांना खेरवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मतदारसंघात आपल्या कार्यकर्त्यांसह मतदार केंद्राच्या जवळ फिरत असल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांनी आचारसंहिता भंग केली का, याची चौकशी पोलिसांनी केली. 
 
आमदार नितेश राणे यांनाही वाकोला पोलिसांनी ताब्यात घेतले. मतदारसंघात बॉडीगार्डसह फिरत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नीतेश राणे यांना समज देऊन सोडून दिले.
 
पोलिसांनी मुलांना ताब्यात घेतल्याने राणे अधिक आक्रमक झाले आहेत. सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. यापुढे वांद्रे पूर्व परिसरात शिवसेनेचा एकही आमदार किंवा मंत्री दिसला, तर त्याची गाडी मी स्वत: अडवणार, असा थेट इशारा राणे यांनी दिला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.