narayan rane

सहा महिन्यात दोनदा आपटण्याचा राणेंचा विक्रम!

वांद्र्याच्या लढाईत माजी मुख्यमंत्री नारायण राणे दणकून आपटले. कुडाळपाठोपाठ वांद्र्यातही शिवसैनिकांनी राणेंना पराभवाची धूळ चारली. राजकीय धूमशानाच्या या दुसऱ्या अंकातही राणेंचं पुरतं वस्त्रहरण झालं.

Apr 15, 2015, 06:35 PM IST

राणेंच्या पराभवाची सोशल मीडियावर चर्चा

राणेंच्या पराभवाची सोशल मीडियावर चर्चा

Apr 15, 2015, 06:03 PM IST

#सामना ची उद्याची हेडलाईन काय असेल ?

सोशल मीडियावर नारायण राणेंच्या पराभवाची चर्चा आहे. नारायण राणेंच्या पराभवाची खिल्लीही उडवली जातेय. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून हा संघर्ष सुरू झाला, तो आजपर्यंच संपण्याचं नाव घेत नाहीय.

Apr 15, 2015, 05:00 PM IST

नादाला लागू नका, उद्धव ठाकरेंचा राणेंना टोला

वांद्र्यात मिळालेल्या विजयानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मतदारांचे आभार मानले. यावेळी त्यांनी शिवसेनेला नादाला लागू नका असा इशारा नारायण राणेंना दिला. तसंच एमआयएमचा प्रभाव ओसरल्याचंही त्यांनी नमूद केलं.  

Apr 15, 2015, 04:39 PM IST

नारायण राणेंनी मते खाल्ली पण...

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वांद्रे पूर्व मतदार संघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांना मिळालेल्या मतांपेक्षा या पोट निवडणुकीत तृप्ती बाळा सावंत यांना अधिक मते मिळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ११ हजार ३२३ मते अधिक मिळाली आहेत.

Apr 15, 2015, 04:05 PM IST

"राणेंशिवाय कोण टिकलं असतं, नारायण राणे लढवय्ये"

 काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे. वांद्रे-पूर्व मतदारसंघात नारायणे राणे यांचा पराभव झाला असला तरी, एक-दोन पराभवाने राणेंना फरक पडत नाही. राणे लढवय्ये नेते आहेत, अशी पाठराखण अशोक चव्हाण यांनी केली आहे.

Apr 15, 2015, 02:46 PM IST

गिरीश महाजन यांच्यावर राणेंचा प्रहार

काँग्रेस नेते नारायण राणे यांनी आपल्या पराभवावर प्रतिक्रिया देतांना, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीकेचा प्रहार केला आहे. गिरीश महाजन यांनी आपली अवकात ओळखावी, त्यांनी नको ते धाडस करू नये, असं खणखणीत उत्तर नारायण राणे यांनी गिरीश महाजन यांना दिलं आहे.

Apr 15, 2015, 02:28 PM IST

सोशल मीडियावर राणेंच्या पराभवाची चर्चा

वांद्रे पूर्व मतदार संघात पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे  यांचा शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांच्याकडून १९ हजार ८ मतांनी पराभव झाला. त्यानंतर सोशल मीडियावर राणे यांच्या पराभवाची चर्चा जास्तच रंगत आहे. राणेंनी निवडणूक का लढविली ते आता राणे यांनी काय करावे, असा सल्ला ही दिला गेलाय. राणेंची खिल्ली उडविण्यात आली आहे.

Apr 15, 2015, 01:48 PM IST