राणेंच्या तक्रारीनंतर खासदार राऊत पोलिसांच्या ताब्यात

शिवसेना खासदार विनायक राऊत यांना काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

Updated: Apr 11, 2015, 04:06 PM IST
राणेंच्या तक्रारीनंतर खासदार राऊत पोलिसांच्या ताब्यात title=

मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत यांना काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या तक्रारीवरून बीकेसी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

खासदार राऊत मतदारसंघात फिरत असल्याची तक्रार राणेंनी केली होती. या तक्रारीवरुन राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सोडून दिलंय.

मतदारसंघात शिवसेनेचा कोणताही बाहेरचा नेता फिरत नसल्याचं सांगत त्यांनी राणेंचे आरोप फेटाळलेत. तसंच आपण मतदार संघातले असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केलाय.

दरम्यान, मला ताब्यात घेतले नव्हते. राणे थयथयाट करत आहेत. त्यांचे डिपॉझिट जप्त होईल, असे राऊत यांनी सांगून शिवसेनेचे बाहेरील कुणी वांद्रे मतदारसंघात नाहीत, मी या मतदारसंघातील रहिवाशी आहे, असे ते म्हणालेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.