तृप्ती सावंत यांची विजयाकडे कुच, राणेंचा पराभव निश्चित

वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसच्या नारायण राणे यांना निर्णयाक आघाडी घेता आलेली नाही. पहिल्या फेरीपासून ते पिछाडीवरच राहिले. मात्र, शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तृप्ती सावंत यांचा विजय निश्चित असून राणेंचा पराभव अटळ असल्याचे दिसून आले आहे.

Updated: Apr 15, 2015, 05:20 PM IST
तृप्ती सावंत यांची विजयाकडे कुच, राणेंचा पराभव निश्चित title=

मुंबई : वांद्रे पूर्व मतदार संघातून काँग्रेसच्या नारायण राणे यांना निर्णयाक आघाडी घेता आलेली नाही. पहिल्या फेरीपासून ते पिछाडीवरच राहिले. मात्र, शिवसेनेच्या तृप्ती सावंत यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे तृप्ती सावंत यांचा विजय निश्चित असून राणेंचा पराभव अटळ असल्याचे दिसून आले आहे.

कॉंग्रेस नेते नारायण राणे यांचे राजकीय भवितव्य पणाला लागलेल्या मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात त्यांची वाटचाल पराभवाच्या दिशेने होताना दिसते आहे. मतमोजणीच्या नऊ फेऱ्यांमध्ये शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांनी नारायण राणेंवर १६ हजार मतांची आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या आणखी काही फेऱ्या शिल्लक असल्या तरी मतमोजणीचा कल पाहता शिवसेनेने नारायण राणे यांना धोबीपछाड दिलेय.

शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत कॉंग्रेसने नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. शिवसेना आणि नारायण राणे यांनी विजयासाठी सर्व शक्ती पणाला लावली होती. पण शिवसेनाच पुन्हा एकदा राणे यांच्यापेक्षा वरचढ ठरली.

गेल्यावर्षी झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोकणातील कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी नारायण राणे यांचा पराभव केला होता. त्यांच्याकडेच प्रचाराची सूत्रे देण्यात आली होती.

तर एमआयएम या पक्षालाही वांद्रे पूर्व मतदारसंघात फारशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. हा नवखा पक्ष तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला.  वांद्रे पूर्वमधील पोटनिवडणुकीत केवळ ३८ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे निकाल काय लागेल, याची उत्सुकता होती. मात्र, यात शिवसेनेने बाजी मारली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.