#सामना ची उद्याची हेडलाईन काय असेल ?

सोशल मीडियावर नारायण राणेंच्या पराभवाची चर्चा आहे. नारायण राणेंच्या पराभवाची खिल्लीही उडवली जातेय. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून हा संघर्ष सुरू झाला, तो आजपर्यंच संपण्याचं नाव घेत नाहीय.

Updated: Apr 15, 2015, 05:19 PM IST
#सामना ची उद्याची हेडलाईन काय असेल  ? title=

मुंबई : सोशल मीडियावर नारायण राणेंच्या पराभवाची चर्चा आहे. नारायण राणेंच्या पराभवाची खिल्लीही उडवली जातेय. नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यापासून हा संघर्ष सुरू झाला, तो आजपर्यंच संपण्याचं नाव घेत नाहीय.

वांद्रे पूर्व पोटनिवडणुकीत नारायण राणेंचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर सर्वात जास्त व्हायरल होणारा मेसेज आहे. नारायण राणेंना आजच्या पराभवा पेक्षा, उद्याच्या #सामना च्या हेडलाईन ची जास्त चिंता असेल.

ही झाली शेरेबाजी, मात्र सामना दैनिक नेहमीच अनोख्या पद्धतीने हेडलाईन करण्यात माहीर आहे. तर सामना नेमकी उद्या काय हेडलाईन करेल हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे, तेव्हा तुम्हीही गेस करा  'सामना'ची उद्याची हेडलाईन काय असेल ?

तुमची हेडलाईन #सामना या शब्दाला हॅश करून सर्वात खालील कमेंन्ट बॉक्समध्ये लिहा. आपली प्रतिक्रिया व्यक्त करा.

उदाहरणार्थ - वांद्रे निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव #सामना

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.