मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नारायण राणे यांची पाठराखण केली आहे. वांद्रे-पूर्व मतदारसंघात नारायणे राणे यांचा पराभव झाला असला तरी, एक-दोन पराभवाने राणेंना फरक पडत नाही. राणे लढवय्ये नेते आहेत, अशी पाठराखण अशोक चव्हाण यांनी केली आहे.
नारायण राणे यांना शिवसेनेच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्याकडून १९ हजार ८ मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
"वांद्रे मतदारसंघात राणेंचा पराभव झाला तरी, मतांची टक्केवारी वाढली आहे. एक-दोन पराभवाने राणेंना फरक पडत नाही. राणेशिंवाय दुसरे कोणी तिथे टिकले नसते. एमआयएमचा प्रभाव वाढला असे म्हणता येणार नाही. एमआयएमला मत देणे म्हणजे एकप्रकारे शिवसेना-भाजप युतीला मत देणे हे नागरिकांना कळाले आहे", असं अशोक चव्हाण यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.