नारायण राणेंनी मते खाल्ली पण...

गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वांद्रे पूर्व मतदार संघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांना मिळालेल्या मतांपेक्षा या पोट निवडणुकीत तृप्ती बाळा सावंत यांना अधिक मते मिळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ११ हजार ३२३ मते अधिक मिळाली आहेत.

Updated: Apr 15, 2015, 04:05 PM IST
नारायण राणेंनी मते खाल्ली पण...  title=

मुंबई : गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात वांद्रे पूर्व मतदार संघात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे दिवंगत नेते बाळा सावंत यांना मिळालेल्या मतांपेक्षा या पोट निवडणुकीत तृप्ती बाळा सावंत यांना अधिक मते मिळाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ११ हजार ३२३ मते अधिक मिळाली आहेत.

बाळा सावंत यांना ऑक्टोबरमध्ये झालेल्या निवडणुकीत ४१,३८८ मते पडली होती. आता त्यात ११, ३२३ मतांची भर पडत तृप्ती सावंत यांना ५२,७११ मते पडली आहे. 

तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांनीही मागील मतांच्या आकडेवारीपेक्षा तब्बल २१ हजार ४७४ मते अधिक पडली आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार संजय बागडी यांना केवळ १२,२२९ मते पडली होती. पण यंदा राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादीच्या साथीने ३३ हजार ७०३ मते पडली आहेत. 

तिसऱ्या क्रमांकावरील एमआयएमचा प्रभाव चालला नाही. यंदाच्या निवडणुकीत सराज खान यांना १५०१५ मते पडली. गेल्या निवडणुकीत त्यांना २३ ९७६ मते पडली होती. यावेळी त्यांना ८९२६ मतांचे नुकसान झाले आहे. 
    

वांद्रे पूर्व पडलेली मतांची तुलना- ऑक्टोबर 2014 - एप्रिल 15, 2015 : 

शिवसेना

प्रकाश बाळा सावंत - ऑक्टोबर 2014 - 41,388
तृप्ती सावंत - 52,711
मतांनी वाढ - 11,323

काँग्रेस :
ऑक्टोबर 2014 - संजीव बागडी - 12,229
एप्रिल 15, 2015 - नारायण राणे - 33,703
मतांनी वाढ 21,474

MIM:
ऑक्टोबर 2014 - सिराज खान - 23,976
एप्रिल 15, 2015 - सिराज खान - 15,050
मतांमध्ये घट  8,926

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.