मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
संततधार पावसामुळे स्लो ट्रॅकवरची अपडाऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे.
Sep 2, 2014, 08:06 AM ISTलोकलमध्ये दादागिरी ; ग्रुपमधील गुंडाला अटक
डहाणू लोकलकमध्ये प्रवाशांना अप-डाऊन करणारे काही ग्रुप्स जागेवरून उठवण्यासाठी दादागिरी करतात.
Aug 12, 2014, 11:46 PM ISTपाहा मुंबईच्या तुलनेत लंडनचा लोकल प्रवास
मुंबईची लाइफलाईन, रोज लाखो प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतात आणि हा प्रवास आहे जगभरातला सगळ्यात स्वस्त प्रवास. कारण मुंबईतल्या ट्रेनचं तिकीट सगळ्यात कमी आहे.
Aug 5, 2014, 11:24 PM ISTपहिल्या पावसानेच सेंट्रल रेल्वेला ब्रेक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2014, 09:35 PM ISTमध्य रेल्वेची सेवा कोलमडली
वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे मध्य रेल्वेची सेवा कोलमडली. आज सकाळी साडेसातच्या सुमारास तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडीत झाला आणि ऐन गर्दीच्यावेळी प्रवाशांचा खोळंबा झाला. मुंबई आणि उपनगरी गाड्या उशिराने धावत होत्या. तर काही गाड्या एकाच जागेवर उभ्या होत्या. याचा फटका कार्यालयीन कर्मचाऱ्यांना बसला.
Apr 29, 2014, 10:56 AM ISTमुंबईतील लोकल ट्रेनचे दरवाजे बंद !
मुंबईतील लोकल ट्रेनचे दरवाजे हे बंद असावेत अशी मागणी रेल्वेपाठोपाठ आता राज्य सरकारनेही केलीये. लोकल ट्रेनच्या स्वयंचलित दरवाज्यांसाठी राज्य सरकारनेही पाठपुरावाही सुरु केलाय. मात्र जीवघेणी गर्दी असलेल्या लोकलचे दरवाजे बंद ठेवणं शक्य आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Apr 29, 2014, 07:53 AM ISTटिटवाळ्याजवळ लोकलचे ४ डबे घसरले
सेंट्रल रेल्वेच्या लोकलचे चार डबे टिटवाळाजवळ घसरले आहेत. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता सुत्रांनी वर्तवली आहे, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
Mar 20, 2014, 04:12 PM ISTठाणे- दिवा दरम्यान महिनाभर मेगाब्लॉग, दोन मार्गांचे काम
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा जंक्शन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसातून दोन वेळा मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आजपासून सकाळी आणि दुपारी बंद असणार आहे.
Oct 23, 2013, 03:02 PM ISTमुंबईत लोकलमध्ये सापडलीत जिवंत काडतूसे
जोगेश्वरी यार्डात उभ्या असलेल्या लोकलमध्ये जिवंत काडतुसं मिळाल्याची घटना घ़डलीय. सीटखाली ही काडतुसं मिळाली आहेत. याबाबतचा तपास सुरू आहे. सफाई कर्मचा-यालाही ही काडतुसं मिळाली आहेत.
Aug 16, 2013, 02:05 PM ISTमुंबईत ट्राफिक जॅम, कोठे तुंबलय पाणी?
गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबईची घडी विस्कटून टाकलीय. शहर आणि उपनगरात बरसणा-या पावसामुळं हिंदमाता, परेल, दादर टीटी, गांधीमार्केट, सायन रोड नंबर 24, महेश्वरी उद्यान भागात पाणी साचलंय.
Jul 24, 2013, 12:10 PM ISTमुंबई जलमय, वाहतुकीची कोंडी
मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकुळ घातलाय. मुंबई आणि उपनगरात पाणीच पाणी रस्त्यावर दिसत आहे. पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय. त्यामुळे मुंबई लोकल आणि फास्ट लेट झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मध्य आणि हार्बरवरील गाड्या वेळेवर धावत आहेत.
Jul 24, 2013, 10:53 AM ISTहार्बरची रेल्वे वाहतूक सुरू, गती कमी
हार्बर मार्गावरील गोवंडी ते चेंबूर स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मंगळवारी दुपारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मात्र, युद्धपातळीवर काम करण्यात आल्यानंतर हार्बरची सेवा सुरू झाली आहे.
Jun 18, 2013, 06:15 PM ISTमुंबई लोकलचे नवे तिकीटदर
मुंबई लोकलच्या नव्या तिकीटदरात आता ३३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या रेल्वे भाडेवाढ निर्णयाबद्दल प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नव्या भाडेवाढीनुसार सेकंड क्लासचे चार रुपयांवरून पाच रूपये तर फर्स्ट क्लासचे किमान तिकीट ४५ रुपयांवरून ५० रुपयांवर गेले आहे. २२ जानेवारीपासून ही भाडेवाढ लागू होणार आहे.
Jan 16, 2013, 10:35 AM ISTहप्तावसूलीसाठी रेल्वे पोलिसांची मुजोरी
मुंबईत वडाळा स्टेशनजवळ चार पोलिसांनी एका विक्रेत्याला धावत्या लोकलमधून फेकल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये हा विक्रेता गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Aug 27, 2012, 11:35 AM ISTमुंबईकरांना 'एसी लोकल' मिळणार...
मुंबईच्या लोकल म्हटल्या की गर्दी ही आलीच... लोकलचा प्रवासात सुखाचा व्हावा यासाठी मात्र आता रेल्वेने एक पाऊल पुढं टाकलं आहे... मुंबईकरांसाठी ‘एसी’ लोकल लवकरच मिळणार आहे.
Jun 7, 2012, 12:09 PM IST