मुंबई : संततधार पावसामुळे स्लो ट्रॅकवरची अपडाऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 25 ते 30 मिनिटं उशीराने सुरू आहे.
घाटकोपर आणि विक्रोळी दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने वाहतूक आणखी विस्कळीत झालीय.
संततधार पावसामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत होण्यास आणखी दोन तास लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रवासासाठी बस आणि इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.
ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबईत संततधार पाऊस होतोय. तर दक्षिण मुंबईत आज पावसाचा जोर कमी दिसून आला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.