ठाणे- दिवा दरम्यान महिनाभर मेगाब्लॉग, दोन मार्गांचे काम

मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा जंक्शन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसातून दोन वेळा मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आजपासून सकाळी आणि दुपारी बंद असणार आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 23, 2013, 03:02 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा जंक्शन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावर दिवसातून दोन वेळा मेगाब्लॉग घेण्यात येणार आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आजपासून सकाळी आणि दुपारी बंद असणार आहे.
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्यावतीने २३ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०१३ या कालावधीत दररोज १५ मिनिटांचे दोन विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ११.३५ ते ११.५० (१५ मिनीटे) वाजेपर्यंत आणि दुपारी ३ ते ३.१५ (मिनीटे) वाजेपर्यंत रेल्वे वाहतूक बंद राहणार आहे.
मध्य रेल्वेवरील ठाणे ते दिवा जंक्शन दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे, तसेच या मार्गावर बोगदाही उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे ब्लॉग घेण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.