मुंबई : मुंबईची लाइफलाईन, रोज लाखो प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करतात आणि हा प्रवास आहे जगभरातला सगळ्यात स्वस्त प्रवास. कारण मुंबईतल्या ट्रेनचं तिकीट सगळ्यात कमी आहे.
मुंबई लोकल ट्रेनमधून एक किलोमीटर प्रवास करण्यासाठी फक्त 11 पैसे लागतात. तर लंडनमध्ये तेवढ्याच एक किलोमीटर प्रवासासाठी 29 रुपए खर्च करावे लागतात.
मुंबई आणि लंडनमधील लोकल ट्रेनच्या भाड्याची तुलना झाली, तशी सेवा-सुविधांची केली, तर मुंबईत प्रवाशांना त्यांच्या तुलनेत सेवा-सुविधा तशा नाहीतच.
जगभरात लंडनमधल्या लोकलचा प्रवास सगळ्यात महागडा आहे. लंडनमध्ये एक किलोमीटर प्रवासासाठी 29.20 रूपये लागतात.
जपानमध्ये एक किलोमोटीर प्रवासासाठी 18 रुपये 90 पैसे लागतात, न्यूयॉर्कमध्ये एक किलोमीटर प्रवासासाठी 11 रुपये 80 रूपए चीनच्या शांघायमध्ये 4.80 रूपए तर मॉस्कोमध्ये 2.30 रूपये आणि तेहरानमध्ये प्रत्येक किलोमीटरमागे 30 पैसे द्यावे लागतात. लोकल ट्रेनच्या तिकीटांचं हे जगभरातलं वास्तव. सगळ्यात स्वस्त प्रवास मुंबई लोकलमधूनच होतो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.