एक्स-गर्लफ्रेंडला तरुणांसह स्कूटीवरुन फिरताना पाहून रोखलं, तरुणीने चाकूने भोसकून तरुणाला केलं ठार अन् नंतर...
Crime News: इंदूरच्या (Indore) विजय नगर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात कॉलेजच्या काही तरुणांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याची चाकूने वार करत हत्या केली. बीटेकच्या विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या (Murder) करणाऱ्यांमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. या तरुणीची ओळख पटली असून तानिया असं नाव आहे.
Jul 27, 2023, 05:24 PM IST
महागड्या गाड्यांमध्ये बसून पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक; मोडस ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावले
Crime News: मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बडवानी जिल्ह्यात पाकिटमारी (pickpockets)करणाऱ्या सरपंच आणि पंचांना पोलिसांनी अटक केली आहे. पाकिटमारी करणारे सरपचं आणि पंचांची पूर्ण टोळी महागडी कार घेऊन चोरी करण्यासाठी बाहेर पडत असत. गर्दीच्या ठिकाणी ते चोरी करत लोकांना लक्ष्य करत असत.
Jul 27, 2023, 04:37 PM IST
Viral Video: हात बांधले, कपडे काढले, लाथा-बुक्क्यांचा पाऊस अन् नंतर तोंडाने उचलायला लावला बूट; धक्कादायक VIDEO व्हायरल
MP Viral Video: मध्य प्रदेशात (Madhya Pradesh) एका 34 वर्षीय व्यक्तीला मारहाण करत नंतर तोंडाने शूज उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ दोन वर्षं जुना आहे. यानंतर पोलिसांनी कारवाई करत प्रमुख आरोपी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना अटक केली आहे.
Jul 26, 2023, 10:07 AM IST
मजुरांना सापडली सोन्याची 240 नाणी, 7 कोटींच्या सोन्याचं कोडं; कुटुंब म्हणतंय "नसती सापडली तर बरं झालं असतं"
एका मजूर कुटुंबाला सोन्याची तब्बल 240 नाणी सापडली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात या सोन्याची किंमत तब्बल 7 कोटी 20 लाख रुपये आहे. मात्र ही सगळी नाणी पोलिसांनी लुटून नेल्याचा कुटुंबाचा आरोप आहे. एक नाणं गुजरातच्या वलसाडमध्ये सापडलं होतं. त्यामुळे मध्य प्रदेश आणि गुजरात असे दोन्ही राज्याचे पोलीस या प्रकऱणाचा तपास करत आहेत.
Jul 25, 2023, 02:10 PM IST
अधिकाऱ्याला पाहून तलाठ्याने गिळल्या 500 रुपयांच्या नोटा; तोंडात हात घालताच चावले बोट
MP Crime News : मध्य प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून तलाठी परीक्षेचा मुद्दा गाजत आहे. अशातच मध्य प्रदेशातील एका तलाठ्याने लाच खाल्ल्याचे प्रकरण समोर आले आहे. अधिकाऱ्यांना पाहताच तलाठ्याने ही रक्कम चावून गिळली आहे.
Jul 25, 2023, 11:30 AM ISTगुरं मोकाट फिरताना दिसल्यास मालकाला स्लीपरचे 5 फटके अन्...; सरपंचाचा नवा नियम, गावकऱ्यांचा मात्र विरोध
5 Slaps With Slipper If Cattle Found Roaming: सरपंचांनी हा नवीन नियम तयार केला असून यासंदर्भातील दवंडीही गावभर पिटण्यात आली आहे. या दवंडीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला आहे.
Jul 23, 2023, 12:53 PM ISTVande Bharat : मध्य प्रदेशात वंदे भारत एक्स्प्रेसला आग; दिल्लीला जात होती ट्रेन
Vande Bharat Express : मध्य प्रदेशातील बिना येथे सोमवारी सकाळी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या डब्याला आग लागली. ही ट्रेन भोपाळहून दिल्लीला जात होती.
Jul 17, 2023, 08:29 AM ISTरात्री शेवटचा सेल्फी काढला, मुलांना औषध पाजलं, नंतर गळफास घेतला; कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने शहर हादरलं
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) भोपाळ (Bhopal) कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येने हादरलं आहे. दांपत्याने आधी आपल्या दोन्ही मुलांना कोल्ड्रिंकमधून सल्फास मिसळून पाजलं, नंतर गळफास घेतला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
Jul 13, 2023, 02:16 PM IST
"मला न विचारता टोमॅटो का वापरला," नाराज पत्नी थेट घर सोडून गेली; पतीची पोलीस ठाण्यात धाव
Viral News: स्वयंपाकात पतीने टोमॅटो वापरल्याने पत्नीने थेट घर सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. पतीचा डबा पुरवण्याचा व्यवसाय असून त्याने स्वयंपाक करताना पत्नीला न विचारताच टोमॅटो वापरला होता. यामुळे पत्नी नाराज झाली आणि घर सोडून गेली.
Jul 13, 2023, 11:30 AM IST
टोमॅटोमुळे मोडू लागले संसार! पतीने भाजीत टोमॅटो टाकल्याने पत्नी घर सोडून गेली निघून
Tomato Rates Hike: देशातील काही शहरांमध्ये टोमॅटोच्या दराने 200 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने अनेकांना या रोजच्या वापरतील फळभाजीला किचन बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मात्र एका पतीला भाजीत टोमॅटो वापरणं चांगलच महागात पडलं आहे.
Jul 13, 2023, 08:15 AM ISTViral Video: पोरीची छेड काढली अन् वरून दादागिरी; भर रस्त्यात पोलिसाने दाखवला इंगा, पाहा कसा उतरवला माज!
Police man beaten youth on street: तरुणाने पोलिसांच्या गचुंडी धरून मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी पोलीसाच्या हातात बॅग असताना देखील त्याने एका हाताने तरुणाला लोळवलं.
Jul 12, 2023, 04:38 PM ISTकुनो अभयारण्यातील आणखी एका चित्त्याचा मृत्यू; पाच महिन्यात 7 चित्ते ठार
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो राष्ट्रीय उद्यानातील (Kuno National Park) आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सातवी घटना आहे. तेजस (Tejas) नावाचा हा चित्ता वनाधिकाऱ्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. उपचारादरम्यान त्याचं निधन झालं.
Jul 12, 2023, 07:28 AM IST
मध्यप्रदेश लघुशंका प्रकरणातील पीडित तरुणाने अखेर दिली प्रतिक्रिया; म्हणाला "ज्याने चूक केली, त्याला..."
Madhya Pradesh Urination Case: सिधी लघुशंका प्रकरणावरुन शिवराज सिंह (Shivraj Singh) सरकारवर सध्या जोरदार टीका केली जात आहे. याप्रकरणी सरकार सध्या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, पीडित दशरम रावत (Dashram Ravat) याने आरोपी प्रवेश शुक्लाला (Pravesh Shukla) सोडून देण्याची विनंती केली आहे. आरोपीला सध्या रिवा जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.
Jul 10, 2023, 08:19 AM IST
कोणताही Mobile घ्या 2 Kg टोमॅटो Free मिळवा! अनोख्या Offer मुळे मोबाईल विक्रेता मालामाल
2kg Tomato Free On Smartphone Purchase: या ऑफरची जाहिरात अनेक ठिकाणी करण्यात आली आहे. ही जाहिरात पाहून शहरातील अनेकजण आवर्जून या मोबाईल शोरुममध्ये मोबाईल खरेदी करण्यासाठी येत असल्याचं शोरुमच्या मालकाने सांगितलं आहे.
Jul 9, 2023, 11:30 AM ISTज्याच्या अंगावर लघुशंका केली त्याचा सन्मान; मुख्यमंत्र्यांनी स्वत:च्या हाताने धुतले आदिवासी तरुणाचे पाय
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) साधी जिल्ह्यात एका आदिवासी व्यक्तीवर लघुशंका करण्यात आल्याने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला होता. दरम्यान, या घटनेतील पीडित व्यक्तीला मुख्यमंत्री निवासस्थानी बोलावून त्याचा सत्कार करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी त्यांची भेट घेत सन्मान केला आणि मदतीचं आश्वासन दिलं.
Jul 6, 2023, 12:33 PM IST