heavy rain

सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान

जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.

May 7, 2017, 01:17 PM IST

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर

शहरासह उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक शहरं आणि गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सध्या भरभरून वाहत आहेत. या धरणाचे ०६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी कोरडे असलेले हे धरण भरभरून वाहत आहे. भरभरून वाहणारं मांजरा धरण पाहण्यासाठी जवळपास १० वर्षाची वाट पाहावी लागली. हे धरण भरल्यामुळे लातूर शहर, उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील तीन वर्षासाठी मिटला आहे.

Oct 5, 2016, 08:12 AM IST

कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण-गोवाच्या काही भागात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Oct 2, 2016, 05:27 PM IST

बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ

जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. अनेक ग्रामीण भागातील नदीनाल्यांच्या पाण्यात वाढ होतेय. शहरातल्या बिंदुसरा नदीला पूर आलाय. जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळं अनेक गावांचा संपर्क तुटलाय. 

Oct 2, 2016, 05:11 PM IST

दुष्काळात होरपळलेलं उजनी 100 टक्के भरलं

दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणा-या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतक-यांना परतीच्या पावसानं जीवनदान दिलं आहे.

Oct 1, 2016, 10:37 PM IST

मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ, लातूरमध्ये पूल गेला वाहून

लातूर जिल्ह्यातल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Sep 25, 2016, 07:07 PM IST

नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडली

जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 96% पावसाची नोंद झाली आहे. सर्व धरणे भरली असून अनेक ओव्हरफ्लो झाली आहेत.

Sep 24, 2016, 05:35 PM IST

बीडमध्ये पावसाची तुफान बॅटिंग, सरस्वती नदीला पूर

बीड जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळं नद्यांना पूर आलाय. सात वर्षांपासून कोरडे पडलेल्या बिंदुसरा धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहू लागलंय. 

Sep 24, 2016, 09:01 AM IST

मराठवाडा चिंब, पावसानं ओलांडली सरासरी

मराठवाडा चिंब, पावसानं ओलांडली सरासरी

Sep 23, 2016, 08:49 PM IST

कोकणात पावसाचा धुमाकूळ, नारंगी, चोरद, जगबुडी नद्यांना पूर

पावसाने कोकणातील उत्तर रत्नागिरीमध्ये धुमाकूळ घातलाय. खेड आणि चिपळूण तालुक्याला पावसाने जोरदार झोडपून काढलं आहे.  खेड येथील नारंगी, चोरद, जगबुडी या नद्यांना मोठा पूर आलाय. 

Sep 23, 2016, 07:45 AM IST

धुळ्यातील नंदाळे बुद्रुक गावात अतिवृष्टी, १ ठार

नंदाळे बुद्रुक गावात मध्यरात्री अतिवृष्टी झाली. यावेळी मंदिरावर विज कोसळली. यात एक तरुण ठार तर 4 जण जखमी झालेत. ठार झालेल्या तरुणाचे संगम कृष्णा वाघ असे नाव असून तो 33 वर्षांचा होता. 

Sep 22, 2016, 05:58 PM IST

अंधारातच उघडले गेले विष्णुपुरी धरणाचे चार दरवाजे

गेल्या चार दिवसांच्या पावसानं नांदेडमध्ये गोदावरीनं धोक्याची पातळी ओलांडलीय. त्यामुळं विष्णुपूरी धरणाचे चार दरवाजे उघडण्यात आलेत.

Sep 17, 2016, 12:51 PM IST