Pro Kabaddi League: अजित चव्हाणच्या बळावर यु मुम्बाने नोंदवला दुसरा विजय, जयपूर पिंक पँथर्सचा केला 2 गुणांनी पराभव

PKL 11: मंध्यतराला मिळविलेल्या आघाडीतून यु मुम्बाने उत्तरार्धात आपल्या खेळातील लय कायम राखली होती. मात्र, जयपूर पिंक पॅंथर्सने उत्तरार्धात उत्तम खेळ दाखवून सामन्यात रंगत आणली होती. 

तेजश्री गायकवाड | Updated: Nov 1, 2024, 11:42 AM IST
Pro Kabaddi League: अजित चव्हाणच्या बळावर यु मुम्बाने नोंदवला दुसरा विजय, जयपूर पिंक पँथर्सचा केला 2 गुणांनी पराभव title=

Jaipur Pink Panthers Vs U Mumba:  प्रो कबड्डी लीगच्या ११व्या पर्वातील दिवाळीच्या पहिल्या दिवशी गुरुवारी झालेल्या सामन्यात यु मुम्बाने सर्वोत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करून जयपूर पिंक पॅंथर्सवर ३९-२७ असा दोन गुणांनी विजय मिळविला. प्रमुख चढाईपटूंच्या अपयशात यु मुम्बाकडून  अजित चव्हाणच्या (14  गुण) आणि जयपूरकडून नीरज नरवालच्या (12गुण) चढायांचा खेळ लक्षवेधक ठरला. यानंतरही पूर्वार्धात यु मुम्बाने चढवलेला लोण आणि त्यांना मिळालेले अतिरिक्त २ गुण निर्णायक ठरले. मागील सामना बरोबरीत खेळल्यानंतर दोन्ही संघ विजयासाठी या सामन्यात उतरले. स्थिर सुरुवात केल्यानंतर दोघांनीही सुरुवातीची काही मिनिटे आपली रणनीती राबवण्यास सुरुवात केली. पण आज यू मुंबा वेगळी योजना आखून अजित चव्हाणला सातत्याने रेड  टाकायला पाठवत होते. अजित जबरदस्त फॉर्ममध्ये होता आणि त्यामुळे यू मुंबा पहिली पाच मिनिटे एका गुणाने पुढे होता आणि स्कोअर 4-3 असा होता. 

जयपूर पिंक पॅंथर्सचा उत्तम खेळ  

जयपूर पिंक पँथर्ससाठी कर्णधार अर्जुन पहिल्या 10 मिनिटांत काही खास खेळ दाखवू शकला नाही. पण अंकुश राठी आणि नीरजच्या जोरावर जयपूरने सलग दोन सुपर टॅकल करत 9-8 अशी आघाडी घेतली. असे असतानाही यू मुम्बाने प्रथम स्कोअर 9-9 असा बरोबरीत आणला आणि नंतर आघाडी प्रस्थापित केली.

 

हे ही वाचा: Pro Kabaddi League: यु मुम्बा आणि बंगाल वॉरियर्सची लढत झाली बरोबरीची, रंगला रोचक सामना

 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pro Kabaddi (@prokabaddi)

 

हे ही वाचा: रोनाल्डो आणि मेस्सीच्या वर्चस्वानंतर नव्या युगाची सुरुवात, 'या' युवा खेळाडूने पटकावला Ballon d'Or 2024 पुरस्कार

यु मुंबाचा खेळ 

रोहित राघवने डू ऑर डायमध्ये बुडवून यु मुंबाची आघाडी आणखी मजबूत केली. मात्र, नीरज नरवालने 37व्या मिनिटाला सुपर रेड करत जयपूरला तीन गुण मिळवून दिले. यामुळे जयपूरने पुन्हा 32-32 अशी बरोबरी साधली. या रेडसह नीरजनेही सुपर-10 पूर्ण केले. जयपूरनंतर रोहितने सुपर रेड मारत मुंबासाठी चार गुणांची आघाडी घेतली आणि गुणसंख्या 36-32 अशी नेली. मुंबाने शेवटच्या मिनिटांत पाच गुणांची आघाडी प्रस्थापित केली. अंतिम चढाईत जयपूरने सुपर टॅकलमधून दोन गुण घेतले, परंतु यु मुंबाने आपली आघाडी कायम राखली आणि 39-37 अशा गुणांसह आपला विजय निश्चित केला.