कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा

कोकण-गोवाच्या काही भागात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

Updated: Oct 2, 2016, 05:27 PM IST
कोकण, मराठवाड्यात ४८ तासात मुसळधार पावसाचा इशारा title=

मुंबई : कोकण-गोवाच्या काही भागात येत्या 48 तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय.

येत्या 24 तासांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईतही पावसाची संततधार सुरूच आहे. 

नांदेडमध्ये आता पावसाने विश्रांती घेतली आहे. शनिवारच्या पावसामुळे पुन्हा एकदा नदी नाल्यांना पूर आला होता. लातूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.