heavy rain

गरज असेल तरच आज घराबाहेर पडा!

मुंबईला मंगळवारी झालेल्या जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. बुधवारी पावसाचा जोर कमी झाल्याने अनेक ठिकाणी शिरलेल्या पाण्याचा निचरा झालाय. त्यामुळे मुंबईतील वाहतूक पूर्वपदावर येती आहे.

Aug 30, 2017, 08:19 AM IST

मुंबईत रेकॉर्ड ब्रेक ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद

मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.

Aug 30, 2017, 07:53 AM IST

मुंबईला पावसाने झोडपलं, अर्धी मुंबई अंधारात

मुंबई शहरात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे बेस्टने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही भागातील वीज पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धारावी, वडाळा, परळ, अपोलो मील कंपाऊंड, नेपीयनसी रोड, नाईक नगर, सायन हॉस्पीटल, सायन कोळीवाडा, परेल नाका, सुपारी बाग, दादासाहेब फाळके मार्ग, डिलाईल रोड येथील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.

Aug 29, 2017, 08:17 PM IST

मुंबईसह राज्यातील या ठिकाणी मुसळधार

मुसळधार पावसाने मुंबई अक्षरश: पाण्याखाली आली आहे. अजूनही पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबईची रेल्वे, बससेवा ठप्प झाली आहे. रस्त्यांवर आणि घरांमध्ये पाणी साचलं आहे.

Aug 29, 2017, 07:29 PM IST

मुसळधार पावसाने मुंबई पाण्याखाली, बघा फोटो

मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्याखाली गेली असून अनेक ठिकाणी पाणी शिरलं आहे. रेल्वे सेवा, बस सेवा, विमान सेवा यामुळे बंद पडली आहे. तर भारतीय हवामान खात्याने दुपारी १.०० वाजता दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील ४ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, अलिबाग, डहाणू व भोवतालच्या परिसरात अतिवृष्टी होणार आहे. त्याच बरोबर पुढील ४८ तासात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणासाठी अतिवृष्टीचा हवामान खात्याने इशारा दिलेला आहे. दिवसभर झालेल्या पावसाने मुंबईचे काय हाल झालेत ते या फोटोंमधून बघा...

Aug 29, 2017, 06:33 PM IST

मुसळधार पावसामुळे मुंबई पाण्यात

गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेहाल झालेल्या मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रात्रीपासूनच पावसाने जोर धरल्याने मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले असून मुंबईच्या लाईफलाईनची सेवाही विस्कळीत झाली आहे.  

Aug 29, 2017, 01:20 PM IST