heavy rain

नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस

जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद नांदेड जिल्ह्यात झाली आहे.

Jun 30, 2016, 08:14 AM IST

हिंगोलीतील सिंदगी गाव परिसरात ढगफूटी

कळमनुरी तालुक्याला मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलं. सिंदगी गाव परिसरात ढगफूटी झाली. यामध्ये गावातल्या अनेक घरांचं अतोनात नुकसान झालं आहे. होतेवारंगा डोंगरकडा, दांडेगाव, रेडगाव परीसरात तासभर मुसळधार पाऊस झाल्यानं, नद्यानाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागलेत. कयादू नदीचं पात्र ओसंडून वाहू लागलंय. अशाच अलोट पाण्याच्या प्रवाहात एकाचा मृतदेह वाहून गेला. दरम्यान कळमनूरी तालुक्यातल्या सालापूर आणि जवळा पांचाल नदीला पूर आल्यानं रेडगावचा संपर्क तुटलाय. 

Jun 29, 2016, 10:29 PM IST

जालन्यात जोरदार पाऊस, नदीच्या पुरात बाईकस्वार वाहून गेला

पावसाने जालन्यातल्या भोकरदनमध्ये केळणा नदीला पूर आला. अलापूरमध्ये एक दुचाकीस्वार या पुरात वाहून गेला.

Jun 25, 2016, 01:58 PM IST

मुंबई आणि उपनगरात जोरदार पाऊस, रेल्वे विस्कळीत

रात्रभरात झालेल्या मुसळधार पावसानं आजच्या दिवसाची सुरूवात मात्र लेटमार्कनं झालीय. मुंबईतल्या तिन्ही रेल्वे मार्गावरची वाहतूक किमान ३० उशिरानं सुरू आहे.

Jun 21, 2016, 08:10 AM IST

लातूरमध्ये पावसाची हजेरी

लातूरमध्ये पावसाची हजेरी 

Jun 12, 2016, 08:11 PM IST

प्रतिक्षेत असलेला मान्सून राज्यात दाखल, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात पाऊस

मान्सून दोन दिवस आणखी लांबणार असे वृत्त हवामान विभागाने वर्तविले होते. मात्र, पावसाने त्याआधीच धडक दिलेय. कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार हजेरी लावली. त्याचवेळी केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. तो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत आहे.

Jun 8, 2016, 10:38 PM IST

कोल्हापूरात मुसळधार पावसाची हजेरी

कोल्हापूरात मुसळधार पावसाची हजेरी 

Jun 8, 2016, 07:54 PM IST

आसाममध्ये जोरदार पावसानंतर भूस्खलनाने १० ठार

आसाम आणि अरुणाचल प्रदेशात अनेक ठिकांणी गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालाय. पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलन झालेय. यात १० जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

May 19, 2016, 03:43 PM IST

मनमाडमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट

मनमाडमध्ये जोरदार पाऊस आणि गारपीट

May 10, 2016, 10:50 AM IST