सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान

जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.

Updated: May 7, 2017, 01:17 PM IST
सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं मोठं नुकसान title=

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बांदा परिसरात रात्री मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. रात्री अचानक झालेल्या या पावसाने शेतीचे सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. सुमारे तासभर हा वादळी पाऊस सुरू होता.

काही भागात घरांवर वृक्ष पडण्याच्या घटना घडल्या आहेत. वीजवाहिन्या तुटल्याने अनेक भागात विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. ही घटना रात्री घडली असल्याने कोणतीही शासकीय मदत गावकऱ्यांना आजून मिळू शकलेली नाही.