'1 एप्रिलपासून...' मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी मोठा निर्णय

FASTag Mandatory: वाहनचालकांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 7, 2025, 03:30 PM IST
'1 एप्रिलपासून...' मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी मोठा निर्णय  title=
फास्टॅग

FASTag Mandatory: चारचाकी वाहन असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेट बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 1 एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. तुम्हाला याबद्दल माहिती असायला हवे. अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. काय आहे हा निर्णय? सविस्तर जाणून घेऊया.  

वाहनचालकांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. टोल नाक्यावरुन जाताना कर वसूलीसाठी याचा उपयोग होतो. आधीच असा निर्णय घेण्यात आला होता पण त्याची 100 टक्के अंमलबजावणी नव्हती. एक कॅश काऊंटर ठेवण्यात आले होते. पण 1 एप्रिल पासून नियम बंधनकारक करण्यात आला आहे.

फास्ट टॅग कार्यरत नसेल तर...

राज्यातील चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 1 एप्रिल 2025 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल.  या निर्णयामुळे वाहतूक कोंडी टळून इंधनाची आणि वेळेची देखील बचत होणार आहे.  फास्ट टॅग कार्यरत नसेल तर वाहन धारकाला पथकर शुल्काच्या दुप्पट शुल्क भरावे लागेल.  त्याचप्रमाणे रोख रक्कम स्मार्ट कार्ड क्रेडिट डेबिट कार्ड किंवा कोड किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे पथकर शुल्क भरायचे असेल तरी देखील दुप्पट पथकर शुल्क भरावे लागेल. एमएसआरडीसीच्या अखत्यारीत 50 टोलनाके असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यात 23 टोल नाके आहेत. या नाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल अशी माहिती ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.