www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत केम्प्स कॉर्नर येथील माउंट प्लांट या २६ मजली इमारतीला आग लागली. या आगीत सहा रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती अग्नीशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे बोलले जात आहे. काल संध्याकाळी साडेसाच्या सुमारास इमारतीला ही आग लागलीय.
माउंट प्लांट इमारतीच्या १२, १३ आणि १४ व्या मजल्यावर काल सायंकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या १६ बंबांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत ही आग विझविण्याचा प्रयत्न सुरू होता. आग विझविताना अग्निशमन दलाचे दोन अधिकारी आणि चार कर्मचारी असे सहा जण जखमी झाले.
नाना चौकात गोपाळराव देशमुख मार्गावरील इमारतीच्या १२ व्या मजल्यावरील घरातून सायंकाळी आग लागली. या इमारतीच्या बहुसंख्य मजल्यांवर रहिवाशांचे वास्तव्य आहे. १२ व्या मजल्यावरील घरातून आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट बाहेर येऊ येत होते. हे वृत्त समजताच काही प्रत्यक्षदर्शींनी इमारतीचा सुरक्षारक्षक आणि अन्य रहिवाशांना सतर्क केले. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोचण्यापूर्वी आगीने रौद्र रूप धारण केले.
दक्षिण मुंबईतल्या माऊंट प्लांट या २६ मजल्याच्य़ा इमारतीत बाराव्या मजल्यावर लागलेल्या आगीत सहा रहिवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या सहाही जणांची ओळख अजून पटलेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
बाराव्या मजल्यावरी बन्सल यांच्या घरात इंटिरीअरचं काम सुरु होतं. तिथं अचानक आगीनं पेट घेतला. त्यानंतर ही आग शेजारच्या गांधी यांच्या घरात पसरली. आग विझवण्याची पराकाष्ठा करणारे अग्निशमन दलाचे सहा जवान जखमी झालेत. तर पाच रहिवाशी ठार झालेत. रात्री उशीरा अथक प्रयत्नानंतर आग अटोक्यात आली. आगीत मृत्यू झालेल्यांचे मृतदेह ओळख पटवण्यासाठी जेजे, ब्रीच कॅन्डी आणि नायर आदी रुग्णालयांमध्ये नेण्यात आले आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.