court

कोर्टात वाढदिवस साजरा करणार सलमान?

बॉलिवुड सुपरस्टार दबंग खान म्हणजे आपला सलमान खान यंदा आपल्या ४७ वाढदिवशी कोर्टात हजर राहणार आहे. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी करायची की नाही हे तो ठरवू शकत नाही आहे.

Dec 14, 2012, 05:40 PM IST

राज ठाकरे यांच्या विरूद्धची याचिका फेटाळली

मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी मनसेला मैदान नाकारल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही न्यायालयावर टीका केली होती.

Dec 12, 2012, 04:45 PM IST

खन्ना संपतीवरून डिंपलचे अनिताला आव्हान

सुपरस्टार राजेश खन्ना तथा काका यांच्या ५०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. अनिता अडवाणी नव्हेत, तर आपणच या मालमत्तेचे खरे वारस असल्याचा दावा करणारी याचिका अभिनेत्री डिंपल कापडिया यांनी दाखल केली आहे. त्यामुळे नवा वाद पुढे आला आहे.

Dec 2, 2012, 04:41 PM IST

मारहाण, काँग्रेसच्या नगरसेवकाला सक्तमजुरीची शिक्षा

कोल्हापूरचे नगरसेवक प्रदीप उलपे याला सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोल्हापूरच्या काँग्रेसच्या नगरसेवकास सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

Nov 3, 2012, 05:51 PM IST

सुरेश जैनांची रवानगी होणार आर्थर जेलमध्ये

आरोपाच्या फे-यात अडकलेल्या आमदार सुरेश जैन यांना कोर्टानं दणका दिलाय. जैन यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत.

Oct 30, 2012, 06:12 PM IST

लता मंगेशकरांना कारणे दाखवा नोटीस

जयप्रभा स्टुडिओ विक्रीप्रकरणी कोल्हापूर दिवाणी न्यायालयानं गानसम्राज्ञी लता मंगशकर यांना नोटीस पाठवलीय.

Aug 31, 2012, 08:35 PM IST

पाकिस्तान कोर्टाची अजब सजा...

पाकिस्तान कोर्टानं एका व्यक्तीला चक्क 112 वर्ष कैद आणि मृत्यूची सजा सुनावलीय. 13 लांकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा आरोप या आरोपीवर होता.

Jun 21, 2012, 02:37 PM IST

जगनमोहन रेड्डी न्यायालयीन कोठडीत

बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने अटकेत असलेले आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि कडप्पाचे कॉंग्रेस बंडखोर खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सीबीआय न्यायालयाने आज सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

May 28, 2012, 07:57 PM IST

नरेंद्र मोदींवर खटला चालणार?

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा दंगलीसाठी खटला चालविण्यात येण्याची शक्यता आहे. मोदी यांच्यावर २००२ मध्ये गोध्रा दंगलीतील दोन समूहात शत्रुत्व निर्माण करणं आणि त्याला खतपाणी घालणं या आरोपाखाली त्यांच्यावर खटला चालण्याची शक्यता आहे.

May 8, 2012, 09:00 AM IST

भगवतगीता : रशियात बंदी याचिका फेटाळली

भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. 'भगवद्‌गीता' हे 'अतिरेकी' साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निकाल रशियातील न्यायालयाने फेटाळला. सायबेरियातील टॉम्स्क येथील न्यायालयात हा खटला सुरू आहे.

Mar 21, 2012, 12:10 PM IST

लादेनच्या तीन पत्नी, पाच मुलांना कोठडी

अमेरिकेने केलेल्या कावाईत कुप्रसिद्ध दहशतवादी ओसामा बिन लादेन मारला गेला असला तरी त्याच्या कुटुंबियांच्या मागील ससेमिरा सुटलेला नाही. लादेनच्या तीन पत्नी आणि पाच मुलांना न्यायालयाने कोठडी ठोठावली आहे.

Mar 19, 2012, 03:45 PM IST

पर्वती उद्यान प्रकरणी महापालिकेला धक्का

पुण्याच्या पर्वतीवरील उद्यानासाठी संपादित करण्यात आलेल्या भुखंडाच्या मोबदल्यापोटी जागा मालकाला १०० % टीडीआर देण्याचा निर्णय मुंबई हायकोर्टानं रद्द केला आहे.

Mar 15, 2012, 02:01 PM IST

सोशल मीडिया मुक्त - सिब्बल

इंटरनेट जगतातील सोशल मिडियावर सेन्सॉर लावण्याची सरकारची योजना नसल्याची माहिती केंद्रीय टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी आज मंगळवारी दिली.

Feb 15, 2012, 03:32 PM IST

आर्धापूर कोर्टाची कौतुकास्पद शिक्षा !

नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

Feb 10, 2012, 08:44 AM IST

कोलकाता आग : १० जणांना पोलीस कोठडी

एएमआरआय रुग्णालयाला आगीत ९० जण मृत्युमुखी पडले. यात ८५ रूग्ण तर ४ कर्मचारी आहेत. याप्रकणी सहा जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dec 10, 2011, 01:02 PM IST