भगवतगीता : रशियात बंदी याचिका फेटाळली

भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. 'भगवद्‌गीता' हे 'अतिरेकी' साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निकाल रशियातील न्यायालयाने फेटाळला. सायबेरियातील टॉम्स्क येथील न्यायालयात हा खटला सुरू आहे.

Updated: Mar 21, 2012, 12:10 PM IST

www.24taas.com, मॉस्को

भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. 'भगवद्‌गीता' हे 'अतिरेकी' साहित्य असल्याचा दावा करत त्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरचा निकाल रशियातील न्यायालयाने  फेटाळला. सायबेरियातील टॉम्स्क येथील न्यायालयात हा खटला सुरू आहे.

'इस्कॉन' या संस्थेने 'भगवद्‌गीते'चा रशियन भाषेतील अनुवाद प्रसिद्ध केला आहे. हे पुस्तक 'अतिरेकी' साहित्य  आहे. त्यामुळे सामाजिक कलह होऊ शकतो, असा याचिकाकर्त्यांचा दावा होता.  गीतेचा रशियन अनुवाद पहिल्यांदा 1788 मध्ये प्रसिद्ध झाला  आहे. त्यानंतर अनेकदा विविध आवृत्त्यांमध्ये या ग्रंथाचे अनुवाद प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान, भारतातील हिंदूंचा पवित्र ग्रंथ भगवतगीतेवर बंदी घातली जावी या मागणीने गेले काही दिवस रशियात जोर धरला होता. पण आता रशियात सायबेरियामधील न्यायालयाने भगवदगीतेवर बंदी लावण्याचा मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे.

याआधी न्यायालयाने याचिकेवरील सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलली होती. भगवदगीतेवर बंदी लावण्याचं प्रकरण सायबेरियातील तोमस्क न्यायालयात मागील सहा महिन्यापासून सुरू आहे.  या पार्श्वभूमीवर रशियाचे भारतातील राजदूत कदाकीन यांनी गीतेवर बंदी आणण्याची मागणी हे वेडाचाराचे कृत्य असल्याचे सांगत खेद व्यक्त केला. ’ रशिया हा धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही विचारांचा देश असून येथे सर्व धमिर्यांना समान वागणूक दिली आहे. सर्व धमिर्यांच्या पवित्र ग्रंथांना येथे आदराचे स्थान आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी रशियन कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागतच केले आहे.