court

पत्नीशी जबरदस्तीनं `सेक्स` बलात्कार नाही - कोर्ट

दिल्लीतल्या एका न्यायालयानं पत्नीवर बलात्कार करण्याचा आरोप असलेल्या एका पतीची निर्दोष सुटका केलीय. हा निर्णय देताना कोर्टानं, पत्नीसोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं धक्कादायक विधान केलंय.

May 12, 2014, 02:44 PM IST

राज ठाकरे यांना हजर राहण्याची न्यायालयाची सक्त ताकीद

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुन्हा अडचण वाढली आहे. ७ जून रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश कल्याण सत्र न्यायालयाने दिले आहे. यावेळी हजर राहण्याची सक्त ताकीद न्यायालयाने दिलेय.

May 8, 2014, 06:41 PM IST

अॅपल विरुद्ध सॅमसंगचा पेटंटवादात कोर्टानं दिला निर्णय

अमेरिकेच्या एका न्यायालयानं अॅपल कंपनीला दोन पेटंटचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणात सॅमसंगला १२ कोटी डॉलर्सची भरपाई देण्याचा आदेश दिला आहे. अॅपल आणि सॅमसंग कंपनीचा पेटंटवाद हा जगभर प्रसिद्ध आहे.

May 4, 2014, 10:26 PM IST

लिएंडर पेस मुलीसाठी कोर्टात

भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने कोर्टात आपल्या मुलीसाठी धाव घेतली आहे. आपल्या मुलीचा ताबा आपल्याकडे असावा, यासाठी पेसने न्यायालयात धाव घेतली आहे.

May 4, 2014, 05:58 PM IST

अशोक चव्हाण कारवाईबाबत तिरोडकर न्यायालयात

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही, अशी याचिका केतन तिरोड़कर यांनी न्यायालयात दाखल केलीये. त्यासाठी सुप्रीम कोर्टाच्या काही निर्णयांचा पुरावा केतन तिरोड़कर यांनी दिला आहे.

May 3, 2014, 11:58 AM IST

पाकिस्तानातील नऊ महिन्याच्या मुसाची हत्येच्या आरोपातून मुक्तता

पाकिस्तानमध्ये मुसा खान या नऊ महिन्याच्या बालकालाही हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Apr 13, 2014, 04:17 PM IST

अनधिकृत बांधकाम पाडण्याचं वेळापत्रक देण्याचे आदेश

अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पिंपरीत पुन्हा एकदा उफाळलाय. अनधिकृत बांधकामांवर हातोडा कधी पडणार याचं वेळापत्रक जाहीर करण्याचे आदेश पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत.

Mar 20, 2014, 10:19 PM IST

प्रेग्नंट पत्नीचं लैंगिक शोषण हे बलात्कारासारखच - कोर्ट

एका विवाहित महिलेचं पतीने केलेलं लैंगिक शोषण हे एका प्रकारे बलात्कारासारखंच असल्याचं दिल्लीतील न्यायालयाने म्हटलं आहे.

Mar 5, 2014, 05:22 PM IST

आसाराम बापूची जामीन याचिका पुन्हा फेटाळली

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा जामीन अर्ज राजस्थानातील जोधपूर उच्च न्यायालयाने फेटाळलाय.

Feb 10, 2014, 05:55 PM IST

लतादीदींच्या घरबांधणीला सरकारचं कोर्टात आव्हान

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कोल्हापुरातील घरबांधणी योजनेला सरकारनं कोर्टात आव्हान दिलंय. मंगेशकर यांची जमीन कमाल नागरी जमीन धारणा कायद्याखाली अतिरिक्त ठरविण्यात आली होती. त्यामुळे त्यांनी तिथं घरबांधणी योजना राबविण्याचं ठरविलं. मात्र, ही योजना राबविताना त्यांनी अटी पाळल्या नसल्याचं कारण देऊन सरकारनं त्यांना नुकतीच घरविक्री करण्यास मनाई केली. या निर्णयास मंगेशकर यांनी याचिकेद्वारं आव्हान दिलं आहे.

Feb 5, 2014, 11:16 AM IST

`हिट अँड रन` प्रकरणात सलमानला दिलासा

`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.

Jan 28, 2014, 01:55 PM IST

`मुख्यमंत्री कोट्यातील घरवाटपाची संपूर्ण माहिती द्या`

मुख्यमंत्री कोट्यातील घर वाटपासंदर्भात राज्य सरकानं दिलेली माहिती अपुर्ण आहे, असा दावा याचिकाकर्त्याने कोर्टात केला आहे. आधी दिलेल्या यादीत नेत्यांच्या नातलगांच्या नावे असलेल्या घरांबाबत राज्य सरकारने अपूर्ण माहिती दिली आहे.

Jan 22, 2014, 05:10 PM IST

विवाहापूर्वी 'सेक्स' अनैतिक, प्रत्येक धर्माला अमान्यच - कोर्ट

विवाहापूर्वी लैंगिक संबंध प्रस्थापित करणं ‘अनैतिक’ आणि ‘प्रत्येक धर्मानुसार चुकीचं’ असल्याचं मत दिल्लीच्या एका न्यायालयानं व्यक्त केलंय.

Jan 6, 2014, 08:37 AM IST

केवळ ३० पैशांसाठी... साडे पाच महिन्यांची शिक्षा!

२६ वर्षांपूर्वी केवळ ३० पैशांवरून झालेल्या एका वादात एका व्यक्तीला न्यायालयानं पाच महिने आणि वीस दिवसांची शिक्षा सुनावलीय.

Jan 1, 2014, 10:06 AM IST

`थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन`साठी बार मालकांची कोर्टात धाव

‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी राज्य सरकानं पहाटे पाच वाजेपर्यंत बार आणि हॉटेल्स सुरू ठेवायला परवानगी दिली आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी ही डेडलाइन रात्री दीड वाजेपर्यंत खाली आणल्यानं हॉटेल व्यावसायिकांची पंचाईत झालीय.

Dec 31, 2013, 10:31 AM IST