सुरेश जैनांची रवानगी होणार आर्थर जेलमध्ये

आरोपाच्या फे-यात अडकलेल्या आमदार सुरेश जैन यांना कोर्टानं दणका दिलाय. जैन यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 30, 2012, 07:21 PM IST

www.24taas.com,जळगाव
आरोपाच्या फे-यात अडकलेल्या आमदार सुरेश जैन यांना कोर्टानं दणका दिलाय. जैन यांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये करा असे आदेश जिल्हा सत्र न्यायालयानं दिलेत.
जळगावातल्या घरकूल घोटाळ्याप्रकरणी जैन यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीय. मात्र आजारपणामुळं सुरेश जैन सध्या मुंबईत जसलोक हॉस्पिटलमध्ये आहेत.
घरकुल घोटाळ्यात अडचणीत आलेल्या सुरेश जैन यांच्याविरोधात अपहाराचा आणखी एक गुन्हा दाखल झालाय. घरकुल, वाघुर पाणीपुरवठा योजना घोटाळा यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँक आणि विमानतळ निर्माण घोटाळा अशा वेगवेगळ्या गुन्ह्यात ७०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा फास जैन यांच्या गळ्याभोवती आवळलाय.
याप्रकरणी जैन आणि प्रदीप रायसोनींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.जळगाव शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सुरेश जैन यांच्याविरोधात विविध घोटाळ्यांप्रकरणी आता सहा गुन्हे दाखल झालेत. नियमबाह्य कामं करुन कोट्यवधी रुपयांचा फायदा आप्तस्वकीयांना करुन दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेला ४०० कोटींच्या डबघाईला आणल्याचा आरोप होतोय. त्यामुळे सुरेश जैन आणखीनच अडचणीत सापडले आहेत.