आर्धापूर कोर्टाची कौतुकास्पद शिक्षा !

नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

Updated: Feb 10, 2012, 08:44 AM IST

केशव घोणसे पाटील, www.24taas.com, नांदेड

नांदेड जिल्ह्यातील आर्धापूर न्यायालायाने दिलेला निर्णय कौतुकाचा विषय ठरला आहे. न्यायालयाने सामाजिक बांधिलकी जपत एका मारहाणीच्या प्रकरणात आरोपीला वृध्दाश्रमात वृध्दाची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे.

विलास वायाळ यांना एका वृध्दाला मारहाण केल्या प्रकरणी अर्धापूरातील न्यायालयाने त्यांना वृध्दाश्रमात वृध्दांची सेवा करण्याची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वगत केलं जात आहे. काही वर्षांपूर्वी विलास वायाळ यांनी आनंद शेंडगे या वृध्दाला मारहाण केली होती. गुन्हेगारात सुधारणा व्हावी आणि वृध्दांविषयी लोकांमध्ये प्रेम निर्माण करण्याच्या उदात्त हेतून न्यायालयानं वायाळ यांना ही शिक्षा सुनावली आहे.

ज्या गावात मारहाणीची घटना घटली त्यांच गावातल्या वृध्दांश्रमात जाऊन आता आरोपीला काम करावं लागणार आहे. याच वृध्दांश्रमातील वृध्दांची दररोज २ तास सेवा करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. आरोपींना त्यांनी केलेल्या गुन्ह्यांचा पश्चाताप व्हावा यासाठीचं न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.