सोशल मीडिया मुक्त - सिब्बल

इंटरनेट जगतातील सोशल मिडियावर सेन्सॉर लावण्याची सरकारची योजना नसल्याची माहिती केंद्रीय टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी आज मंगळवारी दिली.

Updated: Feb 15, 2012, 03:32 PM IST

www.24taas.com, मुंबई


इंटरनेट जगतातील सोशल मीडियावर सेन्सॉर लावण्याची सरकारची योजना नसल्याची माहिती केंद्रीय टेलिकॉम आणि माहिती तंत्रज्ञानमंत्री कपिल सिब्बल यांनी आज मंगळवारी दिली.

 

 

सोशल नेटवर्किंगसाठी आघाडीवर असलेल्या फेसबुक, ट्‌विटर व गुगलला आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याचे न्यायालयाने सांगितले आहे. हे आक्षेपार्ह मजकूर कंपन्यांनी काढून टाकले पाहिजेत. मात्र, सोशल मिडियाने देशाचे नियम व अटी पाळल्या पाहिजेत, असे कपिल सिब्बल म्हणाले.

 

 

प्रिंट व दूरचित्रवाणी वाहिन्यांना काही अटी आणि नियम आहेत. तसे नियम सोशल मिडीयाला सध्या तरी नाहीत. मात्र, त्या मिडियाने देशाचे नियम व अटी पाळल्या पाहिजेत. सोशल मिडियावर सरकारचा सध्या तरी सेन्सॉर लावण्याची कोणतीही योजना नाही, असे सिब्बल यांनी स्पष्ट केले आहे.