जगनमोहन रेड्डी न्यायालयीन कोठडीत

बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने अटकेत असलेले आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि कडप्पाचे कॉंग्रेस बंडखोर खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सीबीआय न्यायालयाने आज सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Updated: May 28, 2012, 07:57 PM IST

 www.24taas.com, हैदराबाद 

बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने अटकेत असलेले आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि कडप्पाचे कॉंग्रेस बंडखोर खासदार वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना सीबीआय न्यायालयाने आज सोमवारी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जगनमोहन यांच्या अटकेनंतर आंध्र प्रदेशात बंदची हाक देण्यात आली होती. वाढता पाठिंब्यामुळे जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले  आहेत.  कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडक पोलीसबंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तीन दिवस चौकशी केल्यानंतर सीबीआयने जगनमोहन यांना रविवारी सायंकाळी  अटक करण्यात आली होती.

जगनमोहन यांना न्यायालयात आज सकाळी  हजर केले असता सीबीआयने न्यायालयाकडे जगनमोहन यांना चौकशीसाठी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने कोठडी दिली आहे. सीबीआयने न्यायालयाने जगनमोहन हवाला रॅकेट चालवत असल्याचेही म्हटले आहे. जगनमोहन यांच्यावर भ्रष्टाचारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.