chief minister

आमिर विधानावर मुख्यमंत्री, पवारांनी बोलणे टाळले तर ओवेसींचा टोला

अभिनेता आमिर खानने मोठ्या तोऱ्यात दिल्लीत असहिष्णेतवर पत्नीचा दाखला देत भाष्य केले. मात्र, त्याच्या वक्तव्यानंतर देशात संतापाची लाट पसरली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य करण्याचे टाळले. तर एमआयएमचे अध्यक्ष असादउद्दीन ओवेसी यांनी आमिरला टोला लगावला.

Nov 24, 2015, 06:48 PM IST

बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?

बिहारच्या दिग्विजयानंतर नितिश कुमारांची दिल्लीकडे आगेकूच?

Nov 20, 2015, 07:19 PM IST

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार : उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री यांची दिवाळीनंतर भेट

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत एकमेकांची उणी-धुणी काढल्यानंतर आता भाजप-शिवसेनेत समीट होताना दिसत आहे. केडीएमसीत युती झाली. आता पुढेचे पाऊल म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे. भेटीचा मुहूर्त दिवाळीनंतर आहे. याभेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होणार आहे.

Nov 10, 2015, 01:08 PM IST

मुख्यमंत्र्यांनी घेतली भाजप अध्यक्षांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्ली गाठली. पहिल्या भेटीत त्यांना राज्यातील अनेक प्रकल्पाबाबत चर्चा केली. आज पुन्हा दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली.

Nov 6, 2015, 08:30 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेची पाहणी

मुख्यमंत्र्यांनी केली जलयुक्त शिवार योजनेची पाहणी

Oct 28, 2015, 10:54 AM IST

शिवसेनेची टीका, मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय. 

Oct 24, 2015, 08:21 AM IST

साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत

साहित्यिकांनी शासकीय पुरस्कार मुख्यमंत्र्यांना साभार केले परत

Oct 23, 2015, 08:25 PM IST

२७ गावांनी कोठे राहायचा याचा फैसला निवडणुकीत : मुख्यमंत्री

कल्याण डोंबिवलीतल्या भाजपचा प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांतून फोडला. २७ गावांनी कल्याण डोंबिवलीत राहायचं की नाही याचा फैसला या निवडणुकीत होईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकलं.

Oct 21, 2015, 09:00 AM IST

महापालिकेत सेना-भाजप 'युती' म्हणूनच लढणार - मुख्यमंत्र्यांचा दिल्लीत दावा

विधानसभेत वेगवेगळं लढलो असलो तरी महापालिकेत मात्र शिवसेना आणि भाजप 'युती' म्हणूनच लढणार, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केलंय. 

Oct 16, 2015, 11:06 PM IST

शिवसेनेची तलवार म्यान, सेना नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी

शिवसेना-भाजपामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेनेकडून एकप्रकारे पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान, यावेळी भाजपाच्या काही नेत्यांच्या वागण्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली. 

Oct 15, 2015, 09:36 AM IST

मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही : संजय राऊत

शिवसेनेच्या शाई हल्ल्याप्रकरणामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिकच वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेच्या या प्रकारामुळे राज्याची बदनामी झाल्याचे म्हटले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोकदार उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र समजलाच नाही.

Oct 13, 2015, 03:23 PM IST

मुख्यमंत्री हे पाहा, दुष्काळासाठी नाना पाटेकरने काय केलं?

दुष्काळग्रस्तांचा केवळ पोकळ आश्वासन देऊन दिलासा देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचे दिसत आहे. त्यांनी दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. यावेळी त्यांनी मदत केली नाही. केवळ पाहणी करुन आश्वासन दिले. मात्र, अभिनेता नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांनी आपल्या परीने आर्थिक मदत केली. ते एवढ्यावर न थांबता, 'नाम फाऊंडेशन' स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी साडेसहा कोटी रुपये जमविलेत. हा निधी लवकच दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे.

Sep 30, 2015, 05:49 PM IST

दुष्काळ : शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना भले मोठे पत्र

यंदाच्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी नुकताच विदर्भातील दुष्काळग्रस्त भागात दौरा करून आत्महत्याग्रस्त गावांना भेटी दिल्या. शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांच्या परिस्थितीचे दाहक वास्तव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अवगत करण्यासाठी आज एक विस्तृत पत्र लिहीले. 

Sep 26, 2015, 08:53 AM IST

'जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री मदत करणार'

मराठवाड्यातील दुष्काळी भागाच्या दौऱ्यासाठी लातूरमध्ये आलेल्या विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यावर तोफ डागली आहे. जपानमध्ये आढावा घेवून मुख्यमंत्री राज्याला मदत करणार आहेत का, असा सवाल उपस्थित केला.

Sep 10, 2015, 03:29 PM IST