मुख्यमंत्र्यांनी घेतली भाजप अध्यक्षांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्ली गाठली. पहिल्या भेटीत त्यांना राज्यातील अनेक प्रकल्पाबाबत चर्चा केली. आज पुन्हा दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली.

Updated: Nov 6, 2015, 08:30 PM IST
मुख्यमंत्र्यांनी घेतली भाजप अध्यक्षांची भेट, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा दिल्ली गाठली. पहिल्या भेटीत त्यांना राज्यातील अनेक प्रकल्पाबाबत चर्चा केली. आज पुन्हा दिल्लीत जाऊन भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली.

भाजपने निवडणुकीआधी महायुती स्थापन केली होती. मित्र पक्षांना मंत्री पदाचे गाजर दाखविले होते. मात्र, वर्षपूर्ती झाली तरी मित्र पक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिलेले नव्हते. तसेच युतीतील भागिदार शिवसेनाही मंत्रीपदावरून नाराज आहे. त्यामुळे मिळेल तिथे भाजपला टार्गेट करण्यात येत आहे. भाजप महायुतीतील पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यातच कोल्हापूर पालिका आणि केडीएमसीत भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे भाजपची पुरती गोची झाली आहे. त्यामुळे या भेटीला महत्व आहे.

राज्यात महागाईने उचल खाल्ली आहे. आधी कांद्याने सामान्यांना रडविले. आता दिवाळीच्या तोंडावर डाळीचे दर गगणाला भिडलेत. त्यामुळे शिवसेनासह विरोधकांनी भाजपला टार्गेट केलेय. भाजपची प्रतिमा खराब झाली आहे. भाजप दिलेले आश्वासन पाळत नाही, अशी मित्रपक्षांची धारणा आहे. त्यामुळे मित्र पक्षांना खूश करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार करु इच्छित आहेत. त्यामुळे आता कोणाला मंत्रीपद मिळणार याचीच उत्सुकता लागली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.