मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही : संजय राऊत

शिवसेनेच्या शाई हल्ल्याप्रकरणामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिकच वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेच्या या प्रकारामुळे राज्याची बदनामी झाल्याचे म्हटले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोकदार उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र समजलाच नाही.

Updated: Oct 13, 2015, 03:23 PM IST
मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही : संजय राऊत title=

जुन्नर, पुणे : शिवसेनेच्या शाई हल्ल्याप्रकरणामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद अधिकच वाढत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेच्या या प्रकारामुळे राज्याची बदनामी झाल्याचे म्हटले. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोकदार उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र समजलाच नाही.

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या विधानावर संजय राऊत यांनी आतिशय तिखट प्रतिक्रीया दिली आहे  मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेलाच नाही, या शब्दात राऊत यांना मुख्यमंत्र्यांना ऊत्तर दिले 

खुर्शिद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनावरून शिवसेना आणि सुधींद्र कुलकर्णी यांच्यातशी शाब्दीक शाईफेक अद्याप सुरू आहे. संजय राऊत यांनी काल कुलकर्णींवर तीव्र शब्दांत टीका केली होती. त्यानंतर आजच्या सामनाच्या अग्रलेखातही खरपूर समाचार घेण्यात आलाय. यावर आता कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली. सामनाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आपल्याला आदर आहे. सेनेनंही इतरांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करावा, अशा शब्दांत त्यांनी राऊत आणि शिवसेनेला सुनावलंय.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र कळलेला नाही मुख्यमंत्र्यांच्या विधानामुळे आणि पाक धार्जिण्यकृतीमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली आहे, असं वक्तव्य आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलंय. काल शिवसैनिकांनी सुधींद्र कुलकर्णींच्या चेहऱ्यावर रंग टाकला होता. त्यानंतर या प्रकारनंतर महाराष्ट्रची बदमानी झाल्याचं म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना, शिवसेना प्रखर राष्ट्रवादी आहे. त्याच राष्ट्रवादी भूमिकेतून पाकिस्तानी कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला. 

पण ज्या तुकाराम ओंबाळेंसारख्या पोलिसांनी पाकिस्तानशी लढतांना मुंबईत हुतात्म पत्करले ते पोलीस दल मुख्यमंत्र्यांनी पाकिस्तानाच्या संरक्षणासाठी उतरवलं. शहीदांचा आणि शिवरायांच्या महाराष्ट्राचा अपमान मुख्यमंत्र्यांनी केलाय असंही संजय राऊतांनी म्हटलंय. पाकीस्तानशी लढणं हा गुन्हा असेल तर, तो गुन्हा शिवसेनेने केला आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.