डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतल्या भाजपचा प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २७ गावांतून फोडला. २७ गावांनी कल्याण डोंबिवलीत राहायचं की नाही याचा फैसला या निवडणुकीत होईल, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी रणशिंग फुंकलं.
२७ गावांची नगरपालिका तयार कऱण्यासाठी आपण अनुकूल असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. ग्रोथ सेंटर या भागात उभारल्यामुळे स्थानिक भूमीपुत्राचा विकास होईल, असं ते म्हणाले. या २७ गावांना स्वतंत्रपणे धावण्याची संधी मिळत नाही तोवर त्यांचा विकास होणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.
गावांमधील निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांचा स्वतंत्र नगरपालिका हा एकच अजेंडा आहे. लोकशाहीत मुख्यमंत्री, मंत्र्यांपेक्षा जनता महत्त्वाची आहे. जनतेचे मत हे सार्वमत मानले जाते. नगरपालिका होण्याच्या दृष्टिकोनातून येथील जनतेने संघर्ष समितीच्या उमेदवारांना निवडून दिले तर नगरपालिका होण्याचा मार्ग सोपा होईल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रणसंग्रामात आता चांगलाच रंग भरु लागलाय. भाजपने शिवसेनेला हादरा देण्यासाठी व्युहरचना केलेय. त्याचाच एकभाग म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्याचा चंग बांधण्यात आलाय. असे असताना सुद्धा भाजपसह इतर पक्षांना मागे टाकत शिवसेनेने आगामी निवडणुकीत आघाडी घेतली आहे. निवडणुकीपूर्वीच शिवसेनेने कल्याण डोंबिवलीत उघडले खाते
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.