शिवसेनेची टीका, मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय. 

Updated: Oct 24, 2015, 08:23 AM IST
शिवसेनेची टीका, मुख्यमंत्र्यांचा बोलण्यास नकार  title=
संग्रहीत

नंदुरबार : दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केलीय. त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिलाय. 

अधिक वाचा : सरकार टिकणार, भाजपशी काडीमोड नाहीच - उद्धव ठाकरेंचे संकेत

नंदुरबार जिल्ह्यातील जलयुक्त शिवाराच्या कामाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. मुंबईतील दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता.

आणखी वाचा : मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे - उद्धव ठाकरेंची घोषणा

मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे असा सणसणीत टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे. राम मंदिर बांधण्याच्या घोषणा पोकळ असल्याची टीकाही उद्धव यांनी केली. भारताला हिंदू राष्ट्र घोषित करा, आम्ही सोबत आहोत, अशी मागणीही त्यांनी केली.

मुफ्ती मोहम्मद सईदचं ऐकता, मग थोडं शिवसेनेचंही ऐका, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आवाहन केलं आहे. तसंच गाईवर चर्चा करण्यापेक्षा महागाईवर चर्चा करा. आम्ही सत्तेत असलो तरी महागाईकडे दुर्लक्ष करु शकत नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले, आमची बांधिलकी जनतेशी असून सत्तेशी नाही असा पुनरुच्चारही त्यांनी केला.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.