मुख्यमंत्री चव्हाण यांचा राजकीय फटाका, शरद पवारांवर कोटी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.
Nov 2, 2013, 12:59 PM ISTनारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधलंय. मी मुख्यमंत्री असताना फाईल पेंडिंग ठेवत नव्हतो. मी एका दिवसात फाईल क्लियर करायचो. चांगल्या अधिका-यांचा वापर करुन घ्यायला हवा असा टोला मारून माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी हा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
Oct 24, 2013, 10:44 AM ISTडॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट
दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.
Sep 28, 2013, 08:04 AM ISTडॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Sep 7, 2013, 09:00 AM ISTविठुराया अशीच कृपा ठेव, मुख्यमंत्र्याचे साकडे
यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.
Jul 19, 2013, 11:49 AM ISTएलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार
मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.
May 9, 2013, 01:01 PM ISTमुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले
एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.
May 9, 2013, 12:28 PM ISTमुख्यमंत्री हे वागणं बरे नव्हे - पवार
पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.
Mar 17, 2013, 10:40 AM IST...तर ढोबळेंना पूर्वीचे पोस्टींग - मुख्यमंत्री
फेरीवाल्याचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे जर दोषी नसतील तर त्यांचे पोस्टींग पूर्वीच्याच ठिकाणी केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.
Jan 17, 2013, 12:34 PM ISTमुख्यमंत्र्यांना महिलांनी घातला घेराव
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी करत महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. महिलांचा हा रुद्रावतार बघून मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, डॉ. अभय बंग यांनी सरकारवर टीका केलीय.
Dec 17, 2012, 03:59 PM ISTकायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.
Nov 26, 2012, 01:38 PM ISTपवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला
राज्यातलं सरकार दोन्ही पक्षांचे आहे. त्यामुळं एकतर्फी निर्णय चालणार नाही अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सुनावले आहे. मुख्यमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही नसल्याचं सांगत काँग्रेसचा मुख्यमंत्री चालणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.
Jul 28, 2012, 09:58 PM ISTदिल्लीत NCPची महत्वाची बैठक
दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणा-या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक होत आहे. दिल्लीत होणा-या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.
Jul 22, 2012, 07:22 PM ISTसांगलीमधली परिस्थिती 'जैसे थे'च!
सांगली जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती जैसे-थेच आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पाण्याची टंचाई आणि चाऱ्याच्या कमतरतेनं ग्रामस्थांची आणि जनावरांची परवड कायम आहे.
Apr 14, 2012, 10:29 PM ISTमुख्यमंत्र्यांवर हायकमांड नाराज ?
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नाही.
Apr 14, 2012, 08:16 PM IST