www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधलंय. मी मुख्यमंत्री असताना फाईल पेंडिंग ठेवत नव्हतो. मी एका दिवसात फाईल क्लियर करायचो. चांगल्या अधिका-यांचा वापर करुन घ्यायला हवा असा टोला मारून माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी हा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.
मी ज्या वेळी मुख्यमंत्री होतो तेव्हा फायलींवर पटापट निर्णय घ्यायचो. दिवसाला दीडशे फायली करायचो. चर्चा करा, असे मी फायलींवर लिहीत नव्हतो तर फायलींवर क्षणात निर्णय घेत होतो, असे सांगत राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याविषयी घेतल्या जात असलेल्या आक्षेपांवर शिक्कामोर्तबच केले.
अधिकारी कसे आहेत, यापेक्षाही आपण त्यांच्याकडून काम कसे करून घेतो, हे जास्त महत्त्वाचे आहे. हल्ली प्रशासनात तक्रार करणे, काम टाळणे या वृत्तीचे लोक वाढत आहेत. आपण जेथे काम करतो तिथल्या गोष्टींना नावे ठेवू नयेत; केलेल्या कष्टाचे कधी प्रदर्शनही करू नये. उलट लोकांना आनंद देणारे काम आपण करायला पाहिजे, असे राणे यांनी टीका करताना म्हटले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ