www.24taas.com, झी मीडिया,पंढरपूर
यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.
राज्यात शांतता, सौख्य आणि सुबत्ता नांदू दे, अशी प्रार्थना राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठूरायाच्या चरणी केली. त्याचेवेळी पावसाची सध्याची स्थिती समाधानकारक आहे. या वर्षी ईश्वर कृपेने आपण एका भिषण दुष्काळी परिस्थितीतून बाहेर पडलो आहोत. या पुढेही उत्तम पाऊस पडू दे. दुष्काळाचे संकट दूर होऊ दे, असं साकडं विठ्ठलाला चव्हाण यांनी घातलं.
या वर्षी सुरूवातीलाच चांगला पाऊस पडलेला आहे. सगळे जलाशय भरायची चिन्ह आहेत. याचवेळी मागच्या वर्षी याच्यापेक्षा निम्यापेक्षा कमी पाऊस, पाणी होतं. मात्र, सुरूवातीला चांगला पाऊस पडला. पेरण्या सुरू झाल्यात. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी वारीला रेकॉर्डब्रेक गर्दी झालेली आहे, असे चव्हाण म्हणालेत.
पंढरपूर विकास आराखडा शासनाने आखलेला आहे. तो आता जवळपास ९५० कोटी रूपयांपर्यंत गेलेला आहे. पंढरपूरमध्ये पुल, रस्ते रूंदीकरणाचे काम झाले आहे. या विकासआराखड्यातील कामे होत आहेत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.