संबंध ठेवताना रक्तस्राव होत असेल तर मुळीच करू नका दुर्लक्ष! नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गेला जीव…

एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शारीरिक संबंध ठेवताना रक्तस्त्राव झाल्यामुळे एका नर्सिंग विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. दरम्यान शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव का होतो, जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Oct 1, 2024, 01:56 PM IST
संबंध ठेवताना रक्तस्राव होत असेल तर मुळीच करू नका दुर्लक्ष! नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा गेला जीव… title=
If there is bleeding during sexual intercourse don t ignore it Nursing student dies health news

गुजरातमधील नवसारी जिल्ह्यातून एक वेदनादायक घटना समोर आलीय. शारीरिक संबंधादरम्यान जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे एका तरुणीचा मृत्यू झालाय. धक्कादायक म्हणजे ही तरुणी नर्सिंगची विद्यार्थीनी होती. गर्लफ्रेंडला रक्तस्त्राव होतोय हे पाहून बॉयफ्रेंडने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याऐवजी इंटरनेवर घरगुती उपाय शोधण्यात वेळ घालवला. दरम्यान पोलिसांनी 26 वर्षीय प्रियकरला अटक केलीय. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने इंटरनेटवर शारीरिक संबंध दरम्यान झालेल्या रक्तस्त्राव थांबवण्यासाठी मोबाईलवर बराच वेळ वाया घालवला होता. त्यानंतर त्याने त्याच्या मित्रांशी संपर्क साधला आणि पीडितेला खासगी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आलं पण तरुणीचा मृत्यू झाला. फॉरेन्सिक अहवालानुसार विद्यार्थ्याचा मृत्यू जास्त रक्तस्त्रावामुळे झालाच समोर आलंय. जर तिला तातडीने वैद्यकीय मदत मिळाली असती तर तरुणीचा मृत्यू झाला नसता असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अहवालात सांगण्यात आलंय की, प्रायव्हेट पार्टला झालेली गंभीर दुखापत आणि जास्त रक्तस्त्राव या दोन कारणामुळे तरुणीचा मृत्यू झाला आहे. 

पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, विद्यार्थिनीच्या प्रायव्हेट पार्टला गंभीर दुखापत झाल्याच समोर आलंय. ज्यामुळे जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, शारीरिक संबंधादरम्यान तरुणीला रक्तस्त्राव होत असल्याचे तरुणाच्या लक्षात आल्यानंतरही त्याने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी हॉटेलमध्ये जवळपास 60 ते 90 मिनिटं वाया घालवली. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तरुणीला मृत घोषित केलं.

शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव का होतो?

योनिमार्गाच्या संसर्गामुळे शारीरिक संबंध दरम्यान रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.
शारीरिक संबंधादरम्यान कोणतीही दुखापत झाल्यास रक्तस्त्राव होण्याची भीती असते. 
हार्मोनल असंतुलनामुळे देखील रक्तस्त्राव होऊ शकतो. 
गर्भाशयाचा कर्करोग, पॉलीप्स किंवा फायब्रॉइड यासारख्या इतर आरोग्य समस्यांमुळे देखील रक्तस्त्रावची शक्यता आहे. 

शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव झाल्यास काय करावे?

शारीरिक संबंध ठेवताना रक्तस्त्राव झाल्यास ताबडतोब संबंध थांबवा आणि घाबरू नका. 

शक्य तितक्या लवकर डॉक्टर किंवा स्त्रीरोग तज्ञाशी संपर्क साधा.

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका.

स्वत:ला विश्रांती द्या आणि पुरेसे पाणी प्या.

स्वच्छतेची काळजी घ्या आणि संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करा.

शारीरिक संबंधादरम्यान रक्तस्त्राव एक गंभीर समस्या असू शकते. याकडे दुर्लक्ष करता न करता, तुम्हाला अशी कोणतीही समस्या असल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. याशिवाय सुरक्षित शारीरिक संबंध ठेवा आणि नियमित आरोग्य तपासणी करा.