मुख्यमंत्र्यांवर हायकमांड नाराज ?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नाही.

Updated: Apr 14, 2012, 08:16 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कारभारावर हायकमांड नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्या दिल्लीत अंतर्गत सुरक्षा परिषदेच्या बैठकीला दिल्लीला जाणार आहेत. मात्र ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटतील काय हे निश्चित झालेलं नाही.

मतदार संघातली कामं होत नसल्याचा आरोप करत आमदारांनी दिल्लीत जाऊन आपलं गाऱ्हाणं मांडल्याची चर्चा होती. त्यातच महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीत राष्ट्रवादीनं मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला दणका दिला होता. त्यामुळं हायकमांडनं आमदारांची नाराजी गांभीर्यानं घेतलीय. अधिवेशन काळातही बैठका घेत आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर धावाधाव करत मुख्यमंत्र्यांनी नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले होते.

सातत्यानं सीएमच्या कारभाराविरोधात तक्रारी होत असल्यानं आता पक्षश्रेष्ठींनी या संदर्भात लक्ष घातलंय. त्यामुळं आता मुख्यमंत्री आपली बाजू हायकमांडकडं मांडणार आहेत. दिल्लीत या चालचाली सुरु असल्यानं मुख्यमंत्रीपदाचे दावेदारही सक्रिय झाल्याचं मानलं जातंय.