www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.
इमारतीच्या तळमजल्यावर एका मंडप डेकोरेटरचं काही अनधिकृत काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळेही अपघात झाला असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याच्याविरूद्ध एफआयआर दाखल झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तर उद्धव ठाकरे यांनीही घटनास्थळाला भेट दिली. या दुर्घटनेची चौकशी होईल, तसंच दोषींवर कारवाई होईल असं ते म्हणाले. दरम्यान, ठाकरे यांनी जे. जे. रुग्णालयाचा आपत्कालीन विभाग आणि वॉर्डांमध्ये दाखल जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. ही दुर्दैवी घटना असून या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करू, पण सध्या जखमींना चांगले उपचार देऊन त्यांचे प्राण वाचविण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणालेत.
मुंबईत डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळची इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यत २३ जणांचा बळी गेलाय. तर ३२ जण जखमी आहेत. तर अजून सुमारे ३० जण बेपत्ता आहेत. ही महापालिकेचीच इमारत होती. घटनास्थळी अजून बचावकार्य सुरू आहे. डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेत २३जणांचा बळी गेलाय. मात्र, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
ढिगारा उपसण्याचं काम अजूनही सुरूच आहे. अजूनही या ढिगा-याखाली ३० पेक्षा जास्त जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेप्रकरणी तळमजल्यावर असलेल्या डेकोरेटरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृतांच्या वारसांना एक लाखांच्या मदतीची घोषणा करण्यात आलीय. तर उपचारांचा सगळा खर्च महापालिका करणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.