audit assembly constituency

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - निलंगा

लातूर जिल्ह्यातील लक्षवेधी असलेला मतदारसंघ म्हणजे निलंगा विधानसभा मतदारसंघ. इथे रंगते ती नात्यांची लढाई. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि त्यांचे नातू भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर यांच्यातल्या या राजकीय लढाईमुळे हा मतदारसंघ राज्यभर चर्चेत असतो.

Oct 8, 2014, 04:20 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - लातूर ग्रामीण

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं वर्चस्व राहिलेल्या या मतदारसंघावर गेल्यावेळी काँग्रेसने कब्जा मिळवला. विलासराव देशमुख यांचे कट्टर समर्थक वैजनाथ शिंदे हे इथले विद्यमान आमदार आहेत. 2009 च्या मतदारसंघ पुनर्रचनेत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या रेणापूर मतदारसंघाचं रुपांतर लातूर ग्रामीण या मतदारसंघात झालं आणि तिथेच भाजपचा हा बालेकिल्ला काँग्रेसच्या ताब्यात गेला. 

Oct 8, 2014, 04:15 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कराड दक्षिण

सातारा जिल्ह्यातील कराड दक्षिण या विधानसभा मतदारसंघातून. गेली सात दशकं काँग्रेसची या मतदारसंघात सत्ता आहे. तर विलासकाका उंडाळकर तब्बल 35 वर्षे इथं आमदार म्हणून कार्यरत आहेत. 

Oct 8, 2014, 03:39 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - माण खटाव

माण खटाव विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघात हा मतदारसंघ येतो. तर यंदाच्या विधानसभेच्या आखाड्यात उतरण्यासाठी अनेक जण बाशिंग बांधून बसलेत.

Oct 8, 2014, 03:32 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पाटण

राजकीय आखाड्यातील अत्यंत चुरशीची लढत जर कुठल्या मतदारसंघात होत असेल तर तो सातारा जिल्ह्यातला पाटण विधानसभा मतदारसंघ. गेल्या वेळी विक्रमसिंह पाटणकरांना अवघ्या 580 मतांनी विजय मिळवता आला होता. 

Oct 8, 2014, 03:24 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - घनसावंगी

राष्ट्रवादी काँग्रेसचा जबरदस्त प्रभाव असलेल्या घनसावंगी मतदारसंघावर राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांची गेल्या 15 वर्षांपासून एकहाती सत्ता आहे. टोपेंचा हा मजबूत गड नेस्तनाबूत करण्यासाठी यावेळी विरोधकांनी ताकत लावण्यास सुरुवात केलीय. त्यामुळे या मतदार संघात होणाऱ्या लढतीकडे आतापासूनच अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

Oct 8, 2014, 03:18 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - भोकरदन

केंद्रीय राज्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख झालेल्या भोकरदन विधानसभा मतदार संघात गेल्या १२ वर्षांपासून मात्र राष्ट्रवादीची सत्ता आहे. दानवेंनी खासदारकी जिंकली असली तरी त्यांच्या पत्नी निर्मला दानवेंना मात्र राष्ट्रवादीच्या चंद्रकांत दानवेंकडून पराभव स्वीकारावा लागलाय. 

Oct 8, 2014, 03:14 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जालना

आलटून पालटून एकेकाला आमदार बनवणारा मतदार संघ म्हणून जालना विधानसभा मतदार संघाची ख्याती आहे. गेल्या २५ वर्षांपासून या मतदार संघात एकदा शिवसेना आणि एकदा काँग्रेसचा आमदार निवडून येण्याची जशी काही प्रथाच पडलीय. त्यामुळे या मतदार संघातून यंदा कोण बाजी मारणार हा औत्सुक्याचा विषय बनलाय.

Oct 8, 2014, 03:04 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - कणकवली

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मतदार संघातून भाजपचे प्रमोद जठार हे आमदार आहेत. गेल्यावेळी त्यांना अवघ्या ३४ मतांनी विजयी मिळाला होते. आता त्यांचा सामना होणार आहे तो नारायण राणेंचे पुत्र नितेश नारायण राणे यांच्याशी... 

Oct 8, 2014, 02:05 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सावंतवाडी

खरंतर सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे आणि नारायण राणे म्हणजे सिंधुदुर्ग असं समीकरण गेल्या काही वर्षात बनलं आहे. पण सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांनी राणेंविरोधात दंड थोपटले आहेत. राणेंना विरोध करण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेचा भगवा हाती घेतलाय. त्यामुळे सावंतवाडीतील राजकारणाला वेगळं वळणं मिळालंय.

Oct 8, 2014, 01:58 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - चिखली

नागपूरनंतर विदर्भातील राष्टीय स्वयंसेवक संघाची सर्वात मोठी ताकद चिखली तालुक्यात असल्याच म्हटलं जातं... बुलढाणा जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हणूनसुद्धा चिखलीकडे बघितलं जातं. हा मतदार संघ सध्या कॉंग्रेसच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत काय केलं ते पाहूया...

Oct 8, 2014, 01:46 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - खामगाव

पांढरं सोनं म्हणजे अर्थातच कापसाच्या पिकासाठी प्रसिद्ध असलेल्या खामगावमध्ये काँग्रेसच्या दिलिपकुमार सानंदा यांनी विजयाची हॅटट्रिक साधलीयं. मात्र खामगावचा विकास केवळ मोठमोठ्या इमारती बांधून होणार नाही, असा खोचक सवाल भाजप नेते करताहेत. या राजकीय लढाईत गोरगरिबांचा विकास मात्र जरा बाजूलाच पडलाय. 

Oct 8, 2014, 01:42 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - सिंदखेडराजा

राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मगाव ही सिंदखेडराजाची खास ओळख. राजकारणाचा विचार करायचा झालं तर या मतदारसंघातून चारवेळा विजयी बाजी मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे याना रोखण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा कंबर कसून सज्ज झालीय. 

Oct 8, 2014, 01:35 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - अकोट

अकोला जिल्ह्यातील 'अकोट विधानसभा मतदारसंघाच्या क्षितिजावर 1990 पर्यंत काँग्रेसचा सूर्य कधी मावळत नव्हता', असं बोललं जायचं... पण, जिल्ह्याच्या राजकीय सारीपटावर भारिप-बहुजन महासंघ-शिवसेनेचा उदय झाला आणि इथली राजकीय समीकरणं बदलली. पाहूयात शिवसेनेचा भगवा घेतलेलेआमदार संजय गावंडे यांनी अकोटमध्ये काय विकास केलाय.

Oct 8, 2014, 01:24 PM IST

ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बाळापूर

अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ... गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिलंय. गेल्या निवडणुकीत भारिपमधील तिकीट वाटपाच्या नाट्यात बळीराम सिरस्कारांना आमदारकीची लॉटरी लागली खरी. पण यावेळी चुरस आणखी रंगतदार ठरणार आहे.

Oct 8, 2014, 01:18 PM IST