बुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊंचं जन्मगाव ही सिंदखेडराजाची खास ओळख. राजकारणाचा विचार करायचा झालं तर या मतदारसंघातून चारवेळा विजयी बाजी मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे याना रोखण्यासाठी शिवसेना पुन्हा एकदा कंबर कसून सज्ज झालीय.
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हा विधासभा मतदार संघ... उल्कापातामुळे तयार झालेलं जगप्रसिद्ध लोणार सरोवर याच मतदारसंघात आहे... लोणार ही या मतदारसंघाची पूर्वीची ओळख... मात्र, 1978 मध्ये या मतदार संघाची पुर्रचना झाली आणि सिंदखेडराजा अशी नवी ओळखला याला मिळाली.
विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार -
शिवसेना - डॉ. शशिकांत खेडेकर
भाजप - गणेश मान्टे
काँग्रेस - प्रदीप नागरे
राष्ट्रवादी - रेखा खेडेकर
मनसे - विनोद वाघ
सिंदखेडराजा, देऊळगाव राजा हे दोन तालुके तसेच लोणार आणि चिखली या तालुक्यातील काही गांवचा समावेश या मतदार संघात होतो.
या मतदार संघात २ लाख ८० हजार २५५ एव्हडी लोकसंख्या आहे. नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना या मतदारसंघातून २९ हजार ९२४ मतांची आघाडी मिळालीय. तर २००९च्या विधानसभा निवडणुकीत आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांना ८१,८०८ तर शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांना ५७,६५८ मते मिळाली होती. शिंगणे यांना २४,१५० मताधिक्य मिळालं होतं.
१९९५ पासून या मतदार संघावर डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची एकहाती सत्ता आहे. १९८० मध्ये शेकापचे भास्कराव शिंगणे यांचा अपवाद वगळता हा मतदार संघ तोताराम कायंदे आणि डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या ताब्यात आहेत. शिक्षण, क्रीडा, महसुल राज्यमंत्री राहिलेले माजी आरोग्य मंत्री डॉक्टर शिंगणे हे पाचव्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत.
- सिंदखेडराजाच्या विकासासाठी २०० कोटींचा निधी मिळवून दिला
- दुष्काळी तालुक्यांसाठी खडकपूर्णा प्रकल्पाला मंजूरी
- जिल्ह्यात ३३ व १३२ के.व्ही उपविजकेंद्राची निर्मिती
- शेतीसाठी खडकपूर्णा प्रकल्पातून पाणी
- ग्रामीण रुग्णालय, ड्रामा सेंटर, क्रीडा संकुल
अशी अनेक कामे पाच वर्षात केल्याचा दावा शिंगणे यांनी केलाय.
विरोधकांनी मात्र शिंगणेंचा दावा फेटाळून लावलाय. अनेक वर्षांपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करणारे शिंगणे विकासाचा दावा करत असले तरी वास्तव काही वेगळचं आहे.
- शेती मालावर प्रक्रिया करणार उद्योग नाही.
- खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी कधी मिळणार
- खामगाव - जालना महामार्गाचे काम रखडले
- खामगाव-जालना रेल्वे मार्गाला राज्य शासनाकडून ५० टक्के निधी मिळवण्यात अपयश
- सिंदखेडराजाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा प्राप्त कधी मिळणार
असे अनेक प्रश्न कायम आहेत..
२००४ आणि २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून डॉक्टर शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यांचा शिंगणे पुढे निभाव लागू शकला नाही. सिंदखेडराजा मतदार संघात यावेळी डॉक्टर शिंगणे विरुद्ध मतदारांमध्ये मोठ्याप्रमाणावर नाराजी असून यावेळी मतदार संघात बदल होणारच असल्याचा दावा नेहमीप्रमाणे विरोधक करत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.