ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - बाळापूर

अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ... गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिलंय. गेल्या निवडणुकीत भारिपमधील तिकीट वाटपाच्या नाट्यात बळीराम सिरस्कारांना आमदारकीची लॉटरी लागली खरी. पण यावेळी चुरस आणखी रंगतदार ठरणार आहे.

Updated: Oct 8, 2014, 01:18 PM IST
 title=

अकोला : अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणजेच बाळापूर विधानसभा मतदारसंघ... गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिलंय. गेल्या निवडणुकीत भारिपमधील तिकीट वाटपाच्या नाट्यात बळीराम सिरस्कारांना आमदारकीची लॉटरी लागली खरी. पण यावेळी चुरस आणखी रंगतदार ठरणार आहे.

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - कलिंगा लांडे
भाजप - तेजराव थोरात
काँग्रेस - सय्यद नतिकोद्दिन खतिब
राष्ट्रवादी - हिदायत खाँ रूम खान
अपक्ष - बळीराम सिरस्कार (भारिप)

विदर्भातील ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाचे शहर म्हणून ओळखला जाणारा अकोला जिल्ह्यातील बाळापुर विधानसभा मतदारसंघ... या मतदारसंघात बाळापुर आणि पातुर या दोन तालुक्यांचा समावेश होतो. कधीकाळी मुघलांची राजधानी म्हणूनही हे शहर ओळखले जात होतं... पण काळाबरोबरच या शहराची ओळख बदलली... या मतदारसंघात मुस्लिम मतदारांबरोबर मराठा, कुणबी आणि माळी या समाजातील मतदारांचे प्रमाण आहे. 

प्रत्येकवेळी नवीन चेहऱ्याला संधी देणारा हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. या विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 79 हजार 216 इतकी मतदारसंख्या आहे. 1990 ते 1999 पर्यंत हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. मात्र 1999 मध्ये काँग्रेसच्या लक्ष्मणराव तायडे यांनी येथून निवडून आले.  2004 मध्ये पुन्हा  भाजपच्या नारायण गव्हाणकर यांनी  बाजी मारलीय.तर 2009 मध्ये भारिप-बहुजन महासंघाने भाजपच्या ताब्यातून हा मतदारसंघ खेचून आणला.

गेल्या काही वर्षात प्रकाश आंबेडकर यांच्या भरीप बहुजनमहासंघाने या विधानसभा मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे. कारण गेल्या 25 वर्षांपासून या मतदारसंघाने सर्वच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलीय. मुस्लीम मतदारांचं प्राबल्य असून इथल्या मतदारांनी सामाजीक बंधूभाव नेहमीच जपला आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भारिप बहुजन महासंघात तिकीट वाटप नाट्यात 'लॉटरी' लागलेल्या बळीराम सिरस्कार यांना मतदारांनी निवडून दिलं. बळीराम सिरस्कर यांनी काँग्रेसच्या रजीयाबी खतीब यांचा 1590 मतांनी परभाव केला. सिरस्कर यांना 39581 इतकी मते मिळाली तर रजीयाबी खतीब यांना 37,991 एव्हडी मते मिळाली होती.  

गेल्या पाच वर्षाच्या आमदारांच्या कामावर नजर टाकल्यास अकोला - शेगाव मार्गावर पथदिवे, बंधारे, शिक्षणासाठी निधी, ग्रामीण भागात रस्ते, बाळापूर बस स्थानकासाठी निधी ही काही ठळक कामे केल्याचा दावा विद्यमान आमदारांनी केला आहे. विद्यमान आमदार सिरस्कर यांनी विकासाचा दावा केला असला तरी बाळापूर मतदारसंघात अद्यापही काही समस्या बाकी आहेत. 

- ग्रामीण भागातील रस्त्यांची दूरवस्था
- शेतीसाठी सिंचन सुविधा नाही
- सिंचन प्रकल्प रखडले
- एम.आय.डी.सी.ची दुरवस्था 
- बेरोजगारी
- कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.