Dwayne Bravo Retirement: "मनाला खेळायचे आहे, पण शरीर साथ देत नाही..." ब्राव्होने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

Dwayne Bravo announces retirement: गुरुवारी रात्री ब्राव्होने त्याच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की त्याच्या मनाला त्याने खेळावे असे वाटत आहे परंतु त्याचे शरीर आता परवानगी देत ​​नाही.

Updated: Sep 27, 2024, 11:30 AM IST
 Dwayne Bravo Retirement: "मनाला खेळायचे आहे, पण शरीर साथ देत नाही..." ब्राव्होने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती title=
Photo Credit: @djbravo47/Instgaram

West Indies Cricketer: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्होने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगचा निरोप घेतल्यानंतर त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. गुरुवारी रात्री ब्राव्होने त्याच्या इन्स्टा पोस्टमध्ये म्हटले आहे की त्याच्या मनाला त्याने खेळावे असे वाटत आहे परंतु त्याचे शरीर आता परवानगी देत ​​नाही. ब्राव्हो हा टी20 अव्वल विकेट घेणारा खेळाडू आहे. वेस्ट इंडिजला टी20 वर्ल्ड कप जिंकवण्यामध्ये त्याचा खूप मोठा वाटा आहे. 

काय म्हणाला ड्वेन ब्राव्हो? 
 ब्राव्होने इन्स्टा पोस्टमध्ये क्रिकेट या खेळाला उद्देशून लिहिले की "प्रिय क्रिकेट, आजच्या दिवशी मी त्या खेळाला निरोप देतो ज्याने मला सर्व काही दिले आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून, मला माहित होते की मला हेच करायचे आहे. हा खेळ मला खेळायचा होता. मला इतर कशातही रस नव्हता आणि मी माझे संपूर्ण आयुष्य तुझ्यासाठी दिले. त्या बदल्यात, तू मला माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी मी स्वप्नात पाहिलेले जीवन दिले. त्यासाठी मी तुझे किती आभार मानू." 

२१ वर्षाचा प्रवास

ब्राव्होने क्रिकेटचा २१ वर्षाचा प्रवास सांगत पुढे लिहले की, " एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून एकवीस वर्षे हा अविश्वसनीय प्रवास केला, अनेक चांगले चढ आणि कमी उतार बघितले. सर्वात महत्वाचे म्हणजे मी माझे स्वप्न जगू शकलो कारण मी तुला (क्रिकेटला) प्रत्येक पावलावर १००% दिले. मला हे नाते सुरू ठेवायला आवडेल. पण वास्तविकतेला तितकेच सामोरे जाण्याची वेळ आली आहे. माझ्या मनाला खेळायची इच्छित आहे, परंतु माझे शरीर यापुढे वेदना, ब्रेकडाउन आणि ताण सहन करू शकत नाही. मी स्वतःला अशा ठिकाणी ठेवू शकत नाही जिथे मी माझ्या संघसहकाऱ्यांना, चाहत्यांना किंवा मी भाग असलेल्या   संघांना निराश करेल. त्यामुळे जड अंतःकरणाने मी खेळातून निवृत्तीची अधिकृत घोषणा करत आहे. आज, चॅम्पियनने निरोप घेतला.

मानले चाहत्यांचे आभार 
" माझ्या चाहत्यांनो, मी तुमच्या अतूट प्रेमासाठी आणि सपोर्टसाठी तुमचे खूप खूप आभार मानतो." असे पुढे पोस्टमध्ये लिहले आहे. याशिवाय त्याने विशेषत  कॅरिबियन, त्रिनिदाद आणि टोबॅगोमधील सर्व चाहत्यांचे त्यांच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल आभार मानले आहे. 
 

"दुसऱ्या बाजूला लवकरच भेटू"  असे लिहत त्याने पोस्टचा शेवट केला आहे.