ऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - जालना

आलटून पालटून एकेकाला आमदार बनवणारा मतदार संघ म्हणून जालना विधानसभा मतदार संघाची ख्याती आहे. गेल्या २५ वर्षांपासून या मतदार संघात एकदा शिवसेना आणि एकदा काँग्रेसचा आमदार निवडून येण्याची जशी काही प्रथाच पडलीय. त्यामुळे या मतदार संघातून यंदा कोण बाजी मारणार हा औत्सुक्याचा विषय बनलाय.

Updated: Oct 8, 2014, 03:04 PM IST
 title=

जालना : आलटून पालटून एकेकाला आमदार बनवणारा मतदार संघ म्हणून जालना विधानसभा मतदार संघाची ख्याती आहे. गेल्या २५ वर्षांपासून या मतदार संघात एकदा शिवसेना आणि एकदा काँग्रेसचा आमदार निवडून येण्याची जशी काही प्रथाच पडलीय. त्यामुळे या मतदार संघातून यंदा कोण बाजी मारणार हा औत्सुक्याचा विषय बनलाय.
 
मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या जालन्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. सध्या काँग्रेसचे कैलास गोरंटयाल या मतदार संघाचं प्रतिनिधीत्व करताहेत. गेल्या निवडणुकीत गोरंटयाल यांची लढत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्याशी झाली होती. 

विधानसभा निवडणूक 2014 चे उमेदवार - 
शिवसेना - अर्जुन खोतकर
भाजप - अरविंद चव्हाण
काँग्रेस - कैलाश गोरंट्याल
राष्ट्रवादी - खुशालसिंग ठाकूर
मनसे - रवी राऊत 

या निवडणुकीत गोरंटयाल यांना 74 हजार 400 तर भास्कर अंबेकरांना 53 हजार ६२९ मते मिळाली.

गोरंटयाल यानी 20 हजार 771 मतांनी विजय मिळवत काँग्रेसचा झेंडा फडकवला. 

विकासकामं

- गेल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत 
- जालना शहराचा पाणीप्रश्न,
- शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे
- जिल्हा महिला रुग्णालय
- शहरात पथदिवे
- महत्त्वाच्या चौकांचं सुशोभीकरण

अशी विकासकामे केल्याचा दावा गोरंट्याल यांनी केलाय. कॉंग्रेस आमदाराचा हा दावा मात्र विरोधकांना अजिबातच मान्य नाहीय. आम्ही केलेल्या कामाचं श्रेय विद्यमान आमदार लाटत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार अर्जून खोतकर यांनी केलाय. 

राजकीय नेतेमंडळी कितीही विकासाच्या गप्पा मारत असले तरी हा मतदार संघ म्हणजे जणू काही समस्यांचं माहेरघर आहे असंच म्हणावं लागेल.
- जायकवाडीच पाणी असूनही फायदा नाही
- शहरात अंतर्गत पाईपलाईन अर्धवट अवस्थेत
- शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता 
- सिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत
- उच्च शिक्षणाच्या सोयी नाहीत
- अरुंद रस्ते
- अतिक्रमणांचा वाढता विळखा
- वाढती स्थानिक गुन्हेगारी
- पाच वर्षात एकही मोठा उद्योग आला नाही
 
या मतदार संघाचं वैशिष्ट्य म्हणजे इथला 65 टक्के भाग हा ग्रामीण असून 35 टक्के भाग शहरी आहे.  

दलित –मुस्लीम समाज 33 टक्के आहे. त्यामुळे ही अल्पसंख्यांक मतं जो उमेदवार आपल्या बाजूने वळवतो तोच इथं विजय मिळवण्यात यशस्वी होतो, असं इथलं राजकीय गणित आहे.

या मतदारसंघात जनतेचा कौल हा आलटून पालटून मिळतो, असं आजवरचा इतिहास सांगतो. त्यामुळे गेल्या काही वर्षात सलग दोन वेळा आमदार होण्याचं भाग्य इथे एकाही आमदाराला मिळालेलं नाही. 

यंदा पुन्हा एकदा मैदानात उतरलेले काँग्रेसचे कैलास गोरंट्याल हा इतिहास बदलतात की शिवसेनेचे अर्जून खोतकर बाजी मारतात याचीच चर्चा सध्या इथे रंगताना पहायला मिळतेय.

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.