महायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार!

शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.

Updated: Sep 24, 2014, 02:48 PM IST
महायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार! title=

मुंबई : शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.

 महायुतीतील चार घटक पक्षांना शिवसेना-भाजपकडून केवळ सात जागांची ऑफर देण्यात आल्याने आज महायुतीला तडा गेला. स्वाभिमानी शेतकरी पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष आणि शिवसंग्राम पक्षाने स्वतंत्र निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे.  

'झी २४ तास'शी बोलताना स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी म्हणाले, आमची जास्त जागांची मागणी नव्हती. जास्त जागा मागत आहेत, असे सांगून आम्हाला बदनाम केले. आम्ही स्वाभिमान गहाण टाकलेला नाही.  राजकीय आयुष्यात इतका मोठा अपमान माझा झालेला नाही. दोन्ही पक्षांनी आमची फसवणूक केलेय.

कमी जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याने महादेव जानकर चिडलेत. आम्ही काही भिकारी नाहीत. ते कोण आम्हाला जागा देणार. आम्हीच त्यांना हवे तर जागा देतो. उलट आम्हाला देत असलेल्या सात जागाही आम्ही नाकारल्या. आम्ही रामदास आठवले आणि महादेव जानकर यांना अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद द्या, अशी मागणी केली होती. पण, त्यास नकार देण्यात आला. भाजप आणि शिवसेनेला जागा वाढवून घ्यायच्या होत्या. त्यामुळे ते आमचा वापर करून घेत होते, असा आरोप जानकर यांनी केला. 

शिवसेना आणि भाजपने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सेना-भाजपचे आमच्याबद्दलचे वर्तन चांगले नाही. आम्हाला फक्त सात जागा देत होते. भाजपने गोड बोलून आम्हाला फसविले. दोन्ही पक्षांनी आमचा विश्वासघात केला, असा हल्लाबोल जानकर यांनी केला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.