महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही: उद्धव

Updated: Sep 23, 2014, 09:33 PM IST
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही: उद्धव title=

मुंबई : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा नसल्याचे स्पष्टोक्ती शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 
त्यांनी सांगितले की, आज वारकऱ्यांनी माझ्या घरी येऊन मला आशीर्वाद दिले आणि आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला समर्थन दिले आहे. माझ्यावर जे प्रेम दाखविले आहे, ते माझ्यासाठी खूप आहे. मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नाही, असे उद्धव ठाकरे यांनी वारकरी संप्रदायासमोर सांगितले. 
वारकरी संप्रदायातील नागरिकांनी शिवसेनेला आगामी निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. 
सर्वजण मुख्यमंत्री होऊ इच्छितात आणि अनेक जण खुर्चीसाठी भांडणं करीत आहे, पण मी भाग्यवान आहे, मला माझ्या डोक्यावर मुकूट नको आहे पण लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून हवा आहे. हे प्रेम कमवावे लागते असेही त्यांनी यावेळी सांगितले. 
शिवसैनिकांनी उद्धव ठाकरेंना महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा यासाठी प्रयत्न केला, पण भाजप असे करण्यास उत्सुक नाही आहे. भाजपच्या मते निवडणुकीनंतर या पदावर बसणारा नेता ठरला पाहिजे. 
उद्धव ठाकरे यांनी १३ सप्टेंबर रोजी एका टीव्ही चॅनलद्वारे आयोजित कार्यक्रमात पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.